मुंबई: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज ईडीने (ED) चौकशीनंतर अटक केली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का मानला जात आहे. राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी महत्वाची बैठक (Uddhav Thackeray's meeting) बोलवली आहे. या बैठकीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे बैठकीमध्ये काय निर्णय घेणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.
16 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी राऊतांना अटक केली आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने संजय राऊतांना अटक केली आहे. संजय राऊत तपासात सहकार्य करत नसल्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ईडी त्यांना आज विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार असून त्याची कोठडी मागणार आहे.
दुसरीकडे, संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले की, ईडीला संजय राऊतांची भीती वाटते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने संजय राऊत यांना पत्रा चाळशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत यांच्या घरातून ईडीला 11.5 लाख रुपये मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य म्हणाले, शिवसेना सोडणार...
संजय राऊत यांच्याकडून ईडी त्या पैशांची माहिती विचारत आहे, हे पैसे कोणाचे आणि कुठून आले? ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या पैशांशी संबंधित प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. याशिवाय पत्रा चाळशी संबंधित संजय राऊत यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कागदपत्रे आणि रोख रक्कम घेऊन ईडीचे पथक ईडी कार्यालयात पोहोचले होते.
मोठी बातमी! संजय राऊतांना अखेर अटक, 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई
काय आहे पत्रा चाळ प्रकरण
पत्रा चाळ घोटाळा हा मुंबईच्या उपनगरातील गोरेगावच्या सिद्धार्थ नगरचा आहे. हा परिसर पत्रा चाळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे 47 एकरात पसरलेले असून एकूण 672 घरे आहेत. याच पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील हेराफेरी प्रकरणाचा तपास आता ईडीच्या हाती आला आहे. पुनर्वसनाचे कंत्राट गुरु आशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड (GACPL) या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, 14 वर्षे उलटूनही लोकांना घर मिळालेले नाही.
महत्वाच्या बातम्या:
सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी! सोने 4700 रुपयांनी स्वस्त, पहा नवीन दर...
शेतकऱ्यांनो केळीची देठं तुम्हाला बनवतील करोडपती! जाणून घ्या मालामाल करणाऱ्या व्यवसायाबद्दल
Share your comments