रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.रेशन कार्ड चे तीन प्रकार असतात हे देखील आपल्याला माहिती आहे. या लेखामध्ये आपण शिधापत्रिकेची प्रकारानुसार लागणारे निकष पाहणार आहोत.
तिहेरी शिधापत्रिका योजना
रेशन कार्डचा उपयोग शासकीय कामासाठी तर होतोच परंतु स्वस्त धान्य दुकानातून रेशन खरेदी करण्यासाठी रेशन कार्ड लागते.सधन कुटुंबातील व्यक्ती स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य बहुतांशी घेत नाहीत.धान्य गरजू व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सधन कुटुंबांना रेशन कार्डवर धान्य देणे बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या पार्श्वभूमीवर राज्यात एक मे 1999 यावर्षी तिहेरी शिधापत्रिका योजना लागू करण्यात आली. या योजनेनुसार राज्यांमध्ये रेशन कार्डधारकांना तीन रंगाच्याशिधापत्रिका वितरित करण्यात येतात. आता आपण या तीनही रंगाच्या शिधापत्रिका साठी कोणते निकष आवश्यक आहेत हे पाहू.
पिवळे रेशन कार्ड साठी निकष
1-आय आर डी पी च्या यादीत समाविष्ट असावी.
2-संबंधित लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15000 हजारच्या मर्यादित असावे.
3-कुटुंबातील व्यक्ती वकील,डॉक्टर,चार्टर अकाउंटंट नसावी.
4- कुटुंबातील कोणताही सदस्य व्यक्ती ही विक्री कर किंवा आयकर तसेच व्यवसाय कर भरत किंवा भरण्यास पात्र नसावी.
5-कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा.
6-कुटुंबाकडे कुठल्याही प्रकारचे चार चाकी वाहन असावे.
7- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायती किंवा एक हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागायत जमीननसावी. दुष्काळी तालुक्यामध्ये याच्या दुप्पट क्षेत्र असेल तरी चालते.
केशरी शिधापत्रिकेसाठी निकष
1-कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त परंतु एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.
2- कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कडे चारचाकी यांत्रिक वाहननसावे.यामध्ये टॅक्सीचालक यांना वगळण्यात आले आहे.
3- कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती जमीन असूनये.
पांढऱ्या शिधापत्रिका साठी निकष
कुटुंबातील सर्व व्यक्ती यांची मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यासोबतच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल किंवा त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर पेक्षा जास्त बारमाही बागायती शेतजमीन असेल अशा कुटुंबांनापांढरी शिधापत्रिका देण्यात येते.
नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार कुटुंब प्रमुखाचे दोन फोटो त्यावर अर्जदाराची सही असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत पती व पत्नीच्या नावे बँक जॉइंट अकाउंट काढल्या बाबतचे बँक पासबुकची प्रत.
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत किंवा आधार कार्ड नोंदणी केली असेल तर त्या पावतीची साक्षांकीत छायांकित प्रत
- नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्या बाबतचा दाखला जोडणे आवश्यक तसे नसेल तर मूळ ठिकाणाची तहसीलदार यांचा शिधापत्रिकेत नाव नसल्याबाबतचे दाखला.
- तुम्ही राहत असलेल्या जागेचा पुरावा म्हणून स्वतःचे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती,तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्रव त्याच्या नावे विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती.(source-mahitiasyalachhavi.com)
Share your comments