देशात कमी किमतीच्या आणि दमदार मायलेज देणार्या टू व्हीलर बाइक ची सर्वात जास्त विक्री होत असते. देशातील मध्यमवर्गीय लोकांना कमी किमतीत दमदार मायलेज देणार्या गाड्या विशेष पसंत पडतात, मित्रांनो जर आपण देखील कमी किमतीत चांगले मायलेज देणारी गाडी खरेदी करू इच्छित असाल, तर आजची बातमी विशेष आपल्यासाठी आहे.
मित्रांनो टीव्हीएस कंपनीने आपल्या टीव्हीएस रेडऑन या गाडीवर एक भन्नाट ऑफर आणली आहे. टीव्हीएस रेड ऑन ही भारतातील सर्वात जास्त मायलेज देणार्या गाड्यांच्या यादीत आहे. मित्रांनो जर आपणास टीव्हीएसची ही गाडी खरेदी करायची असेल तर कंपनीने यासाठी एक विशेष ऑफर काढली आहे. आता टीव्हीएस रेडॉन ही बाईक केवळ सहा हजार रुपये डाऊन पेमेंटवर देखील मिळणार आहे. आज आपण सहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर टीव्हीएस रेडॉन खरेदी केल्यावर किती रुपयांचा ईएमआय अर्थात मासिक हप्ता भरावा लागेल याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
मित्रांनो टीव्हीएस रेड ऑन एकदम दर मायलेजची गाडी आहे, कंपनीच्या मते, ही गाडी 80 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंतची मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीच्या याच दमदार मायलेज मुळे मध्यमवर्गीय लोकांची ही गाडी पहिली पसंत बनू शकते. टीव्हीएस रेडॉन BS6 मॉडेलची किंमत 69233 एवढी आहे. इथे नमूद केलेली किंमत एक्स शोरूम किंमत आहे, म्हणून रोड ऑन प्राईस यापेक्षा अधिक असणार आहे. बाईकदेखो EMI कॅल्क्युलेटर नुसार, जर आपण ही गाडी खरेदी करण्यासाठी सहा हजार रुपये डाऊन पेमेंट लावले, तर आपणास 1981 रुपयाचा मासिक हप्ता पडणार आहे यासाठी बँकेकडून आठ टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे. तसेच तीन वर्षाची फेड सहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर राहणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, टीव्हीएस रेड ऑन वर मिळणारे कर्ज, डाऊन पेमेंट, मासिक हप्ता हे सर्वस्वी आपल्या सिव्हिल स्कोर वर डिपेंडंट राहणार आहे, जर आपला सिव्हिल स्कोर नकारात्मक असेल तर डाऊन पेमेंट, व्याजदर, मासिक हफ्ता इत्यादी मध्ये वाढ होऊ शकते.
Share your comments