देशात दिवसेंदिवस पेट्रोलचे दर लक्षणीय वाढत आहेत, याच पार्श्वभूमीवर सध्या देशात एलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वधारली आहे. देशात इलेक्ट्रिक स्कूटरची एक मोठी रेंज बघायला मिळते. यामध्ये लो रेंजपासून ते हाय रेंज पर्यंत स्कूटर उपलब्ध आहेत. आज आपण टीव्हीएस कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर विषयी जाणून घेणार आहोत. जर आपणास इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर टीवीएस आइक्यूब या टीव्हीएस कंपनीच्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार करू शकता.
टीवीएस आइक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत सुमारे एक लाख रुपये आहे परंतु जर आपल्याकडे ही स्कूटर रोखीने खरेदी करण्यासाठी एवढी मोठी अमाऊंट नसेल तर चिंता करू नका कारण की ही स्कूटर आपण मात्र दहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरून आपल्या नावावर करू शकता. ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर आपणास टीव्हीएस कंपनीची ही स्कूटर खरेदी करायची असेल तर आपणास कंपनीशी लिंक असलेली बँक 90 हजार 699 रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
म्हणजे आपण केवळ 10 हजार 77 रुपये एवढ कमीत कमी डाऊन पेमेंट भरून उर्वरित रक्कम कर्ज म्हणून प्राप्त करू शकता आणि नंतर ते कर्ज मासिक हप्त्याने फेडू शकता. आपणास मासिक हप्ता (EMI) 3255 रुपयाचा भरावा लागणार आहे. ही स्कूटर 10 हजार 77 रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी केल्यानंतर
आपणास सुमारे 3255 रुपयांचे 36 हफ्ते भरावे लागणार आहेत. म्हणजे बँक 36 महिन्यांपर्यंत कर्जाची परतफेड करण्याचा अवधी आपणास देत असते. बँकेने एवढ्या मोठ्या अमाऊंट वर केवळ 9.67 टक्के व्याजदर ठेवला आहे.
Share your comments