२१ जून हा २०२१ या वर्षातला सर्वात मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिश मध्ये समर सॉलस्टाईस (Summer Solstice) म्हटलं जातं. पण हे नेमकं का घडतं? समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे.पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्या समोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो.२१ जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्या समोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस १२ तासांपेक्षाही मोठा असतो.
यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणजे वर्षाच्या या पुढच्या काळामध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो.साधारण २० जून ते २२ जून दरम्यानच्या एका दिवशी दरवर्षी समर सॉलस्टाईस घडतं. म्हणजे २०, २१ वा २२ पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो.यावर्षी २१ जून हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असेल. भारतात २१ जून २०२१ ला दिवस १३ तास १२ मिनिटांचा असेल. उत्तर गोलार्धातल्या प्रत्येक देशासाठी हा कालावधी वेगवेगळा असेल. तर दक्षिण गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र असेल.
एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो.यावर्षी २१ जून हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असेल. भारतात २१ जून २०२१ ला दिवस १३ तास १२ मिनिटांचा असेल. उत्तर गोलार्धातल्या प्रत्येक देशासाठी हा कालावधी वेगवेगळा असेल. तर दक्षिण गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र असेल.पृथ्वीचा उत्तर धृव हा २१ जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात (Tropic of Cancer) थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो.
२१ जूनचं महत्त्वं- अनेक देशांमध्ये २१ जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो. मराठी पंचांगा मध्येही २१ जूनची नोंद 'वर्षा ऋतू प्रारंभ' अशी केलेली असते.पश्चिमेतल्या देशांमध्ये २१ जूनच्या दिवशी 'Spring' म्हणजे वसंत ऋतू संपून 'Summer' म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. हा उन्हाळा २१ वा २२ सप्टेंबरला Autumn Equinox ने संपतो. या दिवशी दिवस आणि रात्र समान तासांचे असतात. यानंतर पश्चिमेकडच्या देशांमध्ये Autumn म्हणजे पानगळीचा मोसम सुरू होतो.२२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो.
Share your comments