ज्योतिषशास्त्रानुसार (According to astrology) जेव्हा एखादा ग्रह राशी (Planetary sign) बदलतो तेव्हा याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. महत्वाचे म्हणजे शनीच्या मार्गीमुळे ५ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. चला आपण जाणून घेऊया राशीभविष्य...
या राशींच्या लोकांची साडेसाती चालू
ज्योतिषशास्त्रानुसार १२ जुलै रोजी शनिदेव (Saturn) मकर राशीत परतले होते, त्यानंतर ते ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहेत. सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती चालू आहे. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर धैय्या सुरू आहे.
फक्त 999 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाइक करा खरेदी; नवीन 'URBN' इ-बाइक लॉन्च
२३ ऑक्टोबरपासून शनिदेवाचे चाल बदलून मार्गी होणार आहे. त्यामुळे आता या लोकांची कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन नोकरीची ऑफर (offer) येऊ शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. जुन्या आजारापासून सुटका मिळू शकते.
रब्बी हंगामातील कडधान्यांचे उत्पादन वाढणार; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
वैदिक ज्योतिषात शनीचे महत्त्व काय आहे?
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय-प्रिय देवता मानली जाते. तूळ राशीत (tul rashi) शनिदेव श्रेष्ठ मानले जातात आणि मेष त्यांची दुर्बलता आहे.
दुसरीकडे शनिदेव हे पुष्य, अनुराधा, पूर्वभाद्रपद नक्षत्रांचे स्वामी आहेत. त्यांना बुध आणि शुक्र यांच्यासोबत मैत्रीची भावना आहे. सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह मानले जातात. शनीच्या राशी परिवर्तनाचा कालावधी सुमारे ३० महिने आहे.
महत्वाच्या बातम्या
मोबाइल चोरीला गेल्यावर सहज करता येणार ब्लॉक; सरकार लवकरच घेणार निर्णय
शेतकऱ्यांनो बाधित जनावरांवर त्वरित उपचार करून घ्या; अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख 60 हजार लसी उपलब्ध
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून वृद्धांना मिळणार लाखों रुपये; घ्या आजच लाभ
Share your comments