![horoscope](https://kjmarathi.b-cdn.net/media/22657/horoscope-1.jpg)
horoscope
मेष
मेष राशीचे लोक आज व्यापाराच्या दृष्टीनं प्रवास करतील. देवाणघेवाणीचे व्यवहार होतील. आज देवाच्या चरणी लाल रंगाचं फूल अर्पण करा.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आज दिवस थकवणारा असेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांची साथ तुम्हाला मिळणार आहे. आज एखादी शुभवार्ता कळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. सांगायच कारण म्हणजे कोणाचीही खिल्ली उडवू नका, ती वेळ तुमच्यावरही येऊ शकते हे विसरु नका. अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करा.
कर्क
कर्क राशीच्या लोकांनी घरात वाद घालू नका. महत्वाचे म्हणजे आज गुळ दान करा, शिवाष्टक वाचा. आजचा दिवस चांगला जाणार आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनी विचारसरणी बदलायला हवी. महत्वाचे म्हणजे आज इतरांशी संवाद साधताना वाणीवर ताबा ठेवा. विशेष म्हणजे एखादी शुभवार्ता कळेल.
शेतकरी मित्रांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये
कन्या
कन्या राशीच्या लोकांचा कामाचा व्याप वाढलेला असेल. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला आज गुरुची आराधना करावी लागेल. याने समाधान मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांनी अती घाईमध्ये वाहन चालवू नये. याचकांना दान करा. आज मित्रपरिवाराची साथ मिळण्याची दाट शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी देखील आजचा आजचा दिवस थकवणारा असेल. आज तुमची नातेवाईकांशी भेट होईल. मोठ्यांचा सल्ला मिळेल.
धनु
धनू राशीच्या लोकांनी कोणत्याही गोष्टीची विनाकारण चर्चा करु नये. आज आरोग्याची काळजी घ्या. जुने मित्र भेटल्यामुळं आज तुम्ही गतकाळातील आठवणींमध्ये रमाल.
सावधान! सर्दी खोकला असू शकतो 'या' आजाराची लक्षणे
मकर
मकर राशीच्या लोकांनो आजचा दिवस व्यवसायासाठी भरभराटीचा आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आज फळणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.
कुंभ
आज कुंभ राशीच्या लोकांचा प्रवासयोग आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. आज कुटुंबाला वेळ द्या.
मीन
मीन राशीच्या लोकांनो कोणत्याही कामात आळस करु नका. आज एखादं नवं काम तुमच्या हाती येणार आहे. ते वेळेत पूर्ण करा, लाभ होईल.
महत्वाच्या बातम्या
कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन
LIC ची जबरदस्त योजना लाँच; गुंतवणुकीवर मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा
नाशिकमधील बनावट कीटकनाशकांचा 295 लिटरचा साठा जप्त
Share your comments