Others News

दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते.

Updated on 13 September, 2022 6:02 PM IST

दैनिक राशिफल (Daily Horoscope) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असेल. वाहन सावकाश चालवा. कोणत्याही महत्त्वाच्या कामात जवळच्या व्यक्तींकडून सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल.

वृषभ

वृषभ राशीच्या कुटुंबातील वाद कमी होतील. स्वतःच्या वाणीवर संयम ठेवा. घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांमध्ये चंचलता वाढेल. काम वेळेत पूर्ण करा. मित्रांची मदत करा. आज तुम्हाला तुमच्या कंपनीला मोठ्या ठिकाणी रिप्रेजेन्ट करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नाराज असलेल्यांची समज काढाल. मान सन्मान मिळेल. दिवस चांगला आहे.

'या' एका चाचणीने कळेल तुमच्या शरीरातील हृदयरोगाचे प्रमाण; वेळीच घेता येणार काळजी

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिकले पाहिजे. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जोडीदारासोबत मतभेद होतील. या राशीचे लोक जे लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये आहेत ते लग्न करण्याचा विचार करतील. व्यावसायिकांना मोठे कंत्राट मिळू शकते. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेताना आधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. मकर राशीचे लोक यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. योग्य दिशेने केलेले प्रयत्न अनुकूल परिणाम देतील. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा. तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी असे काहीही करू नये ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. त्यांना त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. अखेर मेहनतीचं फळ नक्की मिळेल.

धनु

धनू राशीच्या लोकांनो काम मन लाऊन करा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका.

गुगल देतंय 25 लाख रुपये कमविण्याची मोठी संधी; फक्त 'हे' काम करावे लागणार

मकर

मकर राशीची लोक अचानक झालेल्या आर्थिक लाभामुळे तुम्ही मोठा विचार करू लागतील. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिवस अनुकूल जाण्याची शक्यता आहे. मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही आज आनंदी असू शकता.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करा. वरिष्ठांचा सल्ला घेतल्यास मार्ग सापडू शकेल. अनेक चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येतील.

मीन

सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांना ट्रान्सफर लेटर मिळू शकेल. व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये, चुकीच्या मार्गावर जाणे योग्य नाही. मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर
महत्वाची बातमी! शेतजमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स; वाचा सविस्तर
'या' योजनेत फक्त 100 रुपयांपासून पैसे जमा करा; मॅच्युरिटीनंतर 16 लाख रुपये मिळतील

English Summary: Today Horoscope meet minded partner
Published on: 13 September 2022, 06:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)