मेष
एखाद्या नव्या संधीला होकार देताना तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठी आजचा दिवस ही नवी संधी समजा. तुम्ही सिंगल किंवा विभक्त असाल, तर नव्या रिलेशनशिपची मोठी शक्यता दिसते.
वृषभ
या कालावधीत तुमचा विचार किंवा कल्पना यात आज विजय मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. तुमच्या अवतीभवती सुरू असलेल्या राजकारणातून पुढे जा. तुमच्या गरजांचं सुलभीकरण करा आणि उर्वरित आठवड्यात तुमचा दृष्टिकोन अधिक शिस्तबद्ध करा.
मिथुन
तुमचा आधीचा संवाद पारदर्शक ठेवल्याबद्दल तुम्हाला आज हायसं वाटू शकतं. यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या आदराला आणि विश्वासाला पात्र ठरू शकाल. प्रोफेशनल्स आणि स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आज कामात सकारात्मक हालचालीची अपेक्षा करू शकतात.
कर्क
आजचा दिवस तुमचा उत्साह आणि ऊर्जा पुनरुज्जीवित करणारा असू शकतो. तुमची नियोजित कामं पूर्ण करण्याची इच्छा तुम्हाला खूप व्यग्र ठेवेल. तुमचा जोडीदार कदाचित कायम व्यक्त होणार नाही. तुम्ही त्यांच्यावर लक्ष जरूर ठेवा.
सिंह
आज तुम्हाला फार उदार झाल्यासारखं वाटेल आणि तुम्ही कुणाला मदतही कराल. तुमच्या आई-वडिलांनी एखाद्या मुद्द्याबाबत आधी नाराजी व्यक्त केली असेल, तर आता ते तुमच्या मुद्द्याशी सहमत होऊ शकतील. हळूहळू झालेली प्रगती हे चांगलं चिन्ह आहे.
शेतकऱ्यांनो पिकांच्या पेरणीपूर्वी हे एक काम करा; खर्चामध्ये मोठी बचत होईल
कन्या
सध्या घडत असलेल्या घडामोडींबद्दल तुम्ही व्यक्त झाला नाहीत, तर इतरांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. आजचा दिवस कृती करून सिद्ध करण्याचा आहे. तुम्ही नियोजित केलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी युनिव्हर्सकडून तुम्हाला पुरेसा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
तूळ
आजच्या ऊर्जेचा कल गेट-टुगेदरकडे दिसत आहे. तुम्हाला अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात गैरसमज होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींमुळे तुम्ही व्यग्र राहाल.
वृश्चिक
एखाद्या गोष्टीत निराशा हाती आल्याने तुम्हाला हताश वाटण्याची शक्यता आहे; पण ते विचार सोडून लगेचच पुढे जा. तुम्हाला दिलेल्या पर्यायांबाबत जास्त चोखंदळपणा करू नका. वेळ लवकरच त्याची भरपाई करू शकतो. एखादा नवा क्रीडाप्रकार तुमचं लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे.
धनू
आज नशीब तुमच्या बाजूने असावं. रखडलेली कामं मार्गी लागू शकतील. एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून तुम्हाला चांगला सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. वर्क-लाइफ बॅलन्स साधल्यास तुमचा दिवस आणखी सुरळीत जाऊ शकेल.
शेतकऱ्यांनो मसूर मिश्र शेतीची करा लागवड; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न
मकर
छोट्या अंतराचा प्रवास आज घडू शकतो. तुमचे बॉस किंवा वरिष्ठांकडून तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते. ती तुम्ही आता नाकारू शकता. तुमच्या जोडीदारालाही एखाद्या छोट्या ब्रेकची अपेक्षा असू शकते.
कुंभ
कोणत्याही नवीन भूमिकेसाठी थोडे जास्त कष्ट आणि संयमाची गरज भासू शकते. तुमची मुलं तुम्हाला आणि तुमच्या जीवनशैलीला आदर्श मानतात. एखाद्याचं गुपित राखणं आता तुमच्यासाठी आव्हान ठरू शकतं.
मीन
शेवटच्या क्षणाच्या काही कागदपत्रांच्या कामात तुमचा अर्धा दिवस व्यतीत होऊ शकतो. तुम्हाला प्रतीक्षा असलेला आणि महत्त्वाचा कॉल येऊ शकतो. जवळच्या मित्रांच्या सोबतीत तुमची संध्याकाळ इंटरेस्टिंग जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी सुरळीत राहतील.
महत्वाच्या बातम्या
लम्पी प्रादुर्भाव! जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता तसेच धूर फवारणीची जनजागृती आता शिक्षकांवर
शासकीय धान खरेदी विक्रीसाठी 41 ठिकाणी नोंदणी केंद्र; शेतकऱ्यांना होणार फायदा
लम्पी प्रादुर्भाव! जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता तसेच धूर फवारणीची जनजागृती आता शिक्षकांवर
Share your comments