आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सगळ्यात महत्वाच्या कागदपत्रं पैकी कागदपत्र आहेत. जसे कुठल्याही शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा असेल किंवा कुठलीही शासकीय काम असेल तर आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड बऱ्याच ठिकाणी लागते.पॅन कार्डचा उपयोग प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो. पॅन कार्ड के एक दहा अंकी अल्फान्यूमेरिक संख्या आहे जि ही ओळखते.जर हा क्रमांक चुकीचा असेल तर पॅन कार्ड अवैध असते.
जर एखाद्या वेळी पॅन कार्ड हरवले तर अनेक समस्या उद्भवू शकतात.केंद्र सरकारने बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करणे बंधनकारक केले आहे.वेळेला पॅन कार्ड नसल्यामुळे समस्या उद्भवू नये त्यासाठी कुठलेही कागदपत्र विना निव्वळ आधार कार्डच्या मदतीने कुठलेही शुल्क न भरता पॅन कार्ड कसे मिळवावे. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
अशा पद्धतीने पॅन कार्ड साठी करा अर्ज
- यासाठी नवीन आयकर पोर्टल वर जावे आणि नंतर झटपट पॅनसह पर्यायावर जा.
- नवीन झटपट पॅन सुविधा आधार वर इपॅनप्रदान करते.
- त्यानंतर गेट न्यू इपॅनया पर्यायावर क्लिक करा.
- हे वापरकर्त्याला रिअल टाइम आधारावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये इ पॅन देते.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि पुढे दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
- मला कधीही पॅन वाटप केले नाही.
- माझा सक्रिय मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे.
- माझ्या जन्माची संपूर्ण माहिती आधार वर उपलब्ध आहे.
- कायम खाते क्रमांकाच्या अर्जाचा तारखेनुसार मी अल्पवयीन नाही.
वरती दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करा आणि प्रोसेस पूर्ण करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी प्राप्त होतो.
- यानंतर 15 अंकी पोच पावती क्रमांक तयार होईल.
- आत्ता तुमच्या नवीन तयार केलेल्या पॅन कार्डची एक प्रत तुमच्या आधार कार्डशीलिंक केलेल्या तुमचा ई-मेल आयडी वर पाठवले जाईल.
अशा पद्धतीने पॅन कार्डची स्टेटस तपासा
तुमच्या पॅन अर्जाची स्टेटस तपासून घेण्यासाठी पावती वरील क्रमांक वापरावा लागतो. त्यासाठी तात्काल पॅनथ्रू आधार या लिंक वर क्लिक करावे आणि पॅन स्टेटस तपासा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक टाका आणि आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर पाठवलेला ओटीपी सबमिट करा. याद्वारे तुम्ही तुमच्या पॅन अर्जाची स्थिती तपासू शकता.
( संदर्भ- लोकसत्ता)
Share your comments