1. इतर बातम्या

Solar Panel : तुमच्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी हे मॉडेल करेल खर्च! वाचा कशी आहे कंपनीची योजना?

Solar Panel :- सौर ऊर्जेचा वापर हे काळाची गरज असून भविष्यकाळातील विजेच्या संकटापासून वाचण्याकरिता सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे. त्यामुळे सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या देखील अनेक योजना आहेत. अगदी शेतीमध्ये देखील सोलर कृषी पंपांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सोलर रूफ टॉफ योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याकरिता अनुदान देण्यात येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
resco model for solar panel

resco model for solar panel

Solar Panel :- सौर ऊर्जेचा वापर हे काळाची गरज असून भविष्यकाळातील विजेच्या संकटापासून वाचण्याकरिता सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे. त्यामुळे सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या देखील अनेक योजना आहेत. अगदी शेतीमध्ये देखील सोलर कृषी पंपांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सोलर रूफ टॉफ योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याकरिता अनुदान देण्यात येते.

या व्यतिरिक्त काही कंपन्यांच्या माध्यमातून देखील घरावर सोलर पॅनल लावण्यात येत आहे. अशीच एक कंपनी(मॉडेल) घरावर सोलर पॅनल लावण्याकरिता संपूर्ण खर्च करते. परंतु या कंपनीची योजना जरा वेगळी आहे. तीच आपण या लेखात बघणार आहोत.

 रेस्को(RESCO) मॉडेल करेल घराच्या छतावर पॅनल लावण्यासाठी मदत

 घराच्या छतावर सोलर पॅनल लावायची प्रत्येकाची इच्छा असते परंतु यामध्ये लागणारी गुंतवणूक जरा जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच ते परवडेल असं नाही. जर तुमच्याकडे तेवढा पैसा नसेल तर रेस्को नावाचे एक मॉडेल आणले असून या अंतर्गत तुमच्या घरी फ्री मध्ये सोलर सेटअप ही कंपनी करते.

परंतु यामध्ये तुम्ही दर महिन्याला जी काही विजेचा वापर कराल त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. परंतु सोलर पॅनल इन्स्टॉल करण्याला जेवढा खर्च येतो तेवढा संपूर्ण खर्च कंपनी करते. ही एक रिन्यूएबल एनर्जी सर्विस कंपनी असून तिचे नाव रेस्को असे आहे.

ही कंपनी ग्राहकांना रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसच्या माध्यमातून वीज पुरवठा करते. कंपनीने आणलेल्या या मॉडेलच्या माध्यमातून ही कंपनी तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवते. सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याचा मेंटेनन्स आणि व्यवस्थापन देखील ही कंपनीच करते. या सोलर पॅनलच्या माध्यमातून जी काही विजेची निर्मिती होते ती तुमच्या गरजेनुसार तुम्हाला वापरता येते आणि उरलेली वीज ग्रिडला देखील पुरवता येते. 

रेस्को मॉडेल सोलर मध्ये तुम्हाला एक रुपयाची गुंतवणूक करण्याची गरज नाही. या माध्यमातून तुमच्या घराच्या छतावर रेस्को मॉडेलच्या माध्यमातून सौर पॅनल बसवल्यानंतर या संपूर्ण पॅनलचे मॅनेजमेंट आणि ऑपरेट करण्याची जबाबदारी या रेस्कोची असते. या माध्यमातून निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा रेस्को विकू शकते व त्यामुळे ऊर्जेची हानी टळते. हा एक फायदेशीर पर्याय असून यामुळे तुमचा महिन्याला विजेवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होते.

English Summary: This model will cost you to install solar panels in your house! Published on: 28 August 2023, 09:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters