काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोबाईल फोनवर अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटच्या एका पर्वाची सुरुवात केली व देशांमध्ये 5G चे युग सुरू झाले. सध्या देशातील काही निवडक शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु या पार्श्वभूमीवर देशांमध्ये दोन वर्ष आधीच 5G स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. तसेच या स्मार्टफोनच्या किमती देखील खूपच कमी झाले असून अगदी परवडण्याजोग्या किमतीत असे स्मार्टफोन सध्या मिळत आहेत. त्या लेखात आपण अशाच महत्त्वपूर्ण तीन 5G स्मार्टफोन बद्दल माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:देशात 5G सेवा लॉन्च: जाणून घ्या 5G सेवा सुरू झाल्याने काय होतील फायदे? वाचा सविस्तर
परवडणाऱ्या किमतीत मिळणारे 3 5G स्मार्टफोन
1- सॅमसंग गॅलक्सी M3 5G- या स्मार्टफोनची किंमत अकरा हजार 499 रुपये असून हा डुएल सिमला सपोर्ट करतो व अँड्रॉइड बारावर ऑपरेट होतो.
या स्मार्ट फोनचा डिस्प्ले साडे सहा इंचाचा असून एचडी प्लस आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी सातशे प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 6 जीबीपर्यंत रॅम दिली असून पहिला सेंसर 50 मेगापिक्सेलचा तर दुसरा 2 मेगापिक्सेलचा आहे. त्याची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे.
2- रेडमी 11 प्राईम 5G- या स्मार्टफोनची किंमत 13999 रुपये असून यामध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये फोनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास देण्यात आला असून या नवीन रेडमी फोनमध्ये ऑक्टा कोर मीडिया टेक डायमेन्सिटी सातशे प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये सहा जीबी पर्यंत रॅम 128 जीबी पर्यंतस्टोरेज मिळतो.
3- रियलमी नाझरो 50 5G- या स्मार्टफोनची किंमत 13999 रुपये आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा रियलमीचा सर्वात परवडणारा स्मार्ट कोण आहे.
यामध्ये 6.58 इंचाचा एफएचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर्स डुएल रियर कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यामध्ये ते 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4800mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Share your comments