अनेकदा आपण पाहतो की प्रत्येक सणाला बाजारात चायनीज वस्तू जास्त प्रमाणात विकल्या जातात. म्हणजे उदाहरणच घ्यायचे झाले तर दिवाळीच्या फटाक्यांपासून ते रक्षाबंधनाच्या राखी पर्यंत केवळ चिनी वस्तूंनी बाजारपेठ व्यापलेली दिसते. आपण स्वतः स्वावलंबी होऊन भारतात बनवलेल्या साहित्याचा वापर केला पाहिजे.
त्यासाठी देशात स्वावलंबी भारताची मोहीम देखील सुरू आहे. यामध्ये जर राखी बनवण्याचा व्यवसायची निवड सीजनल बिझनेस म्हणून केली तर कमी खर्चात आणि घरबसल्या चांगला नफा देणाऱ्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे.
तुम्ही राखी बनवण्याचा व्यवसाय ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात सुरू करू शकता. त्यामुळे तुमच्या सोबत तुम्ही काही लोकांना देखील रोजगार देऊ शकतात.
आपल्याला माहित आहेच की पारंपारिक राखी एक सुशोभित रेशमी धागा आहे. हा एक साधा धागा असू शकतो किंवा तो मणी किंवा डिझाईन करून सजवला जाऊ शकतो.
राखी चे धागे दागिन्यांनी देखील जडवले जाऊ शकतात.भाऊ बहिणीचे प्रेमाचे बंध दृढ करण्यासाठी आणि बंधुभाव वाढविण्यासाठी भारतामध्ये रक्षाबंधन साजरा केला जातो हे आपल्याला माहिती आहे.
नक्की वाचा:तरुणांनो सोलरचा उद्योग करा सुरु, भविष्याचा वेध घेतला तर आख्ख मार्केट तुमचं होईल
राखी बनवण्याचा व्यवसाय
राखी बनवण्याचा व्यवसाय कोणतीही व्यक्ती कमी भांडवली गुंतवणुकीत सुरु करु शकते.हा एक सीजनल बिझनेस असून तुम्ही यामध्ये राखी बनवणे सोबतच बुटीक ज्वेलरी आणि फ्रेंडशिप बँड देखील साइड बिझनेस म्हणून बनवू शकतात.
आजकाल लहान मुले, किशोरवयीन आणि तरुणांमध्ये हा एक अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. छोट्या भांडवलात घरबसल्या राखी बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Cow Dung Processing!शेणापासून लाकूड आणि कागद अशा पद्धतीने बनवा आणि कमवा लाखो रुपये
राखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
राखी बनवण्याच्या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही मशिनरी ची गरज नाही. राखी सजवण्यासाठी रेशमी रंगाचे धागे, बांगड्या, रिबन, सामान्य हस्तकला वस्तू, गोंद, सुती धागा, मनी, सिक्वीन चाकू, कात्री इत्यादी काही मूलभूत साधनांची आवश्यकता असते.
राखी बनवण्यासाठी प्रथम मनगटाच्या आकारापासून पंधरा ते वीस सेंटीमीटर चा धागा कापून घ्या. त्यानंतर सुई मध्ये धागा टाका आणि मनी टाका. त्यानंतर धाग्याच्या दोन्ही भागात गाठी बांधा. जेणेकरून मनी तयार होतील व ते धाग्यातून बाहेर येत नाही.
जर तुम्हाला डिझायनर राखी बनवायचे असेल तर बांगड्या, रिबन, पुठ्ठा असे साहित्य गोल आकारात कापून धाग्यात चिकटवा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवू शकता. जसे की, लहान मुलांसाठी राखी,जरीच्या फुलांचे राखी इत्यादी होय.
राख्यांची विक्री कुठे करायची?
स्थानिक दुकानदार आणि गिफ्ट शॉप्स मध्ये तुम्ही राखी विकू शकता. याशिवाय राखी विकण्यासाठी तुम्ही स्वतःचे छोटे दुकान उघडण्याचा विचार करू शकता. तुम्ही फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन इत्यादी ऑनलाईन मार्केट प्लेस मधून देखील विक्री करू शकता.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो: मटक्यात मशरूम वाढवून व्हा करोडपती; हा आहे सोप्पा उपाय
Share your comments