आपणास जर बाईक खरेदी करायची असेल, आणि आपला बजट हा कमी असेल तर हि बातमी आपल्या कामाची ठरू शकते. आज आपण भारतातील सर्वात स्वस्त गाडीविषयी जाणुन घेणार आहोत, हि गाडी स्वस्त तर आहेच शिवाय ह्या गाडीचे मायलेज देखील खुप चांगले आहे
म्हणून हि गाडी कमी बजेट मधील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. भारतातील टू व्हिलर गाड्यांची सर्वात लोकप्रिय कंपनी हिरो मोटोकॉर्प ह्या कंपनीची एचएफ हि एक कमी बजेट मधील सर्वात लोकप्रिय बाईक ठरली आहे. हि बाईक आपल्या किमतीमुळे व मायलेजमुळे मध्यमवर्गीयांची पहिली पसंद बनत चालली आहे.
हिरो मोटोकॉर्प ह्या टू व्हिलर कंपनीने HF Deluxe ह्या बाईकला BS6 प्रणालीचे 97.2 cc एअर-कूल्ड 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 8000 rpm वर 8.24 bhp पॉवर आणि 5000 rpm वर 8.05 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनीने बाईकच्या इंजिनला 4-स्पीड ट्रान्समिशन दिले आहे. ही मोटरसायकल मायलेज साठी लोकप्रिय ठरली आहे. हि बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 83 किमी पर्यंत धावते. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 52,700 रुपये आहे, जी तिच्या टॉपच्या ऑल Fi-i3S या मॉडेलसाठी 63,400 रुपयांपर्यंत जाते. ह्या बाईकच्या ड्रम ब्रेक अलॉय व्हील मॉडेलची किंमत 53,700 रुपये आहे.
जर आपल्याला कमी किंमतीत बाईक हवी असेल तर हि बाईक एक चांगला पर्याय ठरू शकते. हि गाडी कमी किंमतीत अधिक मायलेज देणारी बाईक आहे त्यामुळे ह्या सेगमेंट मध्ये हि बाईक अव्वल स्थानी येते. अवघ्या 52,700 एक्स शोरूम किमतीत मिळणाऱ्या या गाडीला मध्यमवर्गीय व नौकरी करणारे लोक चांगलीच पसंती देत आहेत. हिरो ची हि गाडी स्प्लेंडर नंतर सर्वात जास्त विकली जाणारी बाईक ठरली आहे.
Share your comments