रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळतो हे आपल्याला माहिती आहे. यासाठी शासनाचे काही नियम असून कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्तीसाठी पात्र आहेत ते देखील सरकारने नमूद केले आहे. परंतु बरेच सरकारी कर्मचारी किंवा ज्यांचे उत्पन्न कालांतराने वाढले आहे ते अजूनही स्वस्त धान्य योजनांचा लाभ घेत आहेत.
परंतु अशा व्यक्तींनी आता सावध होण्याची गरज असून त्यांनी त्यांचे रेशनकार्ड परत करणे गरजेचे आहे. यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहु.
तुमची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा
तुमचे मासिक अथवा एका वर्षाचे आर्थिक उत्पन्न जर रेशन कार्डच्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत जी काही मर्यादा आहे ती पार करत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
म्हणून तुम्ही तुमच्या वार्षिक आणि मासिक उत्पन्नाची मर्यादा तपासणे गरजेचे आहे. परंतु तुबे रेशन कार्ड संबंधित आर्थिक उत्पन्नाच्या संबंधित असलेल्या नियम तोडून जर या योजनेचा लाभ घेत असाल तर केंद्र सरकार संबंधित व्यक्तीकडून 27 रुपये प्रति किलोप्रमाणे धान्याची किंमत वसूल करू शकते. जेव्हापासून तुम्ही अपात्र ठरला आहात तेव्हापासून ही वसुली करण्यात येईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी
आपल्याला माहित आहेच कि बरेच सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेतात.जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अशा कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा वाढण्याची शक्यता असल्यामुळे हे आता दारिद्र रेषेखालील येणार नाहीत हे तेवढेच सत्य आहे.
परंतु तरीदेखील केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी रेशनकार्डचा फायदा घेत असल्याचे दिसल्यास त्यांना तुरुंगवास देखील करू शकतो. त्यासाठी अशा कर्मचाऱ्यांनी रेशन कार्ड परत करावे अशा पद्धतीचे आवाहन करण्यात आले आहे.
अजून महत्त्वाचे काही नियम
तुम्ही दारिद्र्यरेषेखाली येत नसाल,तूमच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसोयी आहेत परंतु तरीसुद्धा तुम्ही रेशन कार्डचा फायदा घेतात, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल,
कुटुंबाचे मासिक उत्पन्न प्रतिमहा तीन हजार रुपयांच्या वर असेल, एपीएल योजनेसाठी दरमहा उत्पन्न दहा हजारांपेक्षा जास्त नसावे, किंवा एकापेक्षाजास्त ठिकाणी रेशन कार्ड काढल्यास कारवाई होऊ शकते.
नक्की वाचा:Important: युवकांसाठी व्यवसाय उभा करायला मदत करेल 'ही' योजना, मिळेल 50 लाखापर्यंत कर्ज
Share your comments