आधार कार्ड हेआजच्या घडीला सगळ्यात महत्वाचे कागदपत्र आहे.तुम्हाला कुठल्याही योजनांचा लाभ मिळवणे असो किंवा शासकीय काम त्यासाठी आधार कार्ड खूप गरजेचे आहे. परंतु आपल्याला माहित आहेच की, बऱ्याचदा आधार कार्ड मध्ये नावात बदल होणे,जन्मतारखेत बद्दल, चुकीचा मोबाईल क्रमांक असे बर्याच प्रकारच्या चुका होतात.
परंतु या चुका छोट्या असल्या तरी त्यामुळे आपल्याला याचा खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टी दुरुस्त करता येतात.
परंतु सरकारी नियमानुसार या गोष्टी अपडेट करायला देखील काही प्रकारचे नियम आहेत. तर या लेखात आपण या बद्दल माहिती घेऊ.
1- आधार कार्ड वरील नाव कितीदा अपडेट होते?- समजा आधार कार्डवर तुमचे नाव काही चुकले असेल तुम्ही ते अपडेट किंवा नावामध्ये बदल करू शकता. परंतु तुम्हाला नावातील बदल फक्त दोनदाच करता येतो त्याच्या नंतर तुम्हाला बदल करता येणे शक्य नाही.
2- आधार कार्ड वरील पत्त्यातील बदल- हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचं कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात व त्यांचा पत्ता बऱ्याचदा बदलतो. आपल्याला आधार कार्डवरील आपला पत्ता देखील अपडेट करावा लागतो. परंतु यामध्ये तुम्हाला पत्ता कितीही वेळा अपडेट किंवा बदलू शकतात.
3- मोबाईल क्रमांक अपडेट- हीसुद्धा समस्या बहुतांशी लोकांना येते. कारण आपण जेव्हा पहिल्यांदा आधार नोंदणी करतो तेव्हा आपला मोबाईल नंबर हा वेगळाच असतो.
बऱ्याचदा मोबाईल नंबर कालांतराने बदलला जातो त्यामुळे आधार लिंक मोबाइल नंबर च्या बाबतीत फार मोठी समस्या निर्माण होते. कारण बऱ्याच ठिकाणी ओटीपी आधारसोबत नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर येतो.
यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला अपडेट केलेला नसेल तर तुम्हाला तो सर्वप्रथम अपडेट करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर जावे लागते.
4- मर्यादेपेक्षा जास्त बदल करायचे असल्यास-जर तुम्हाला नाव,जन्मतारीख आणि लिंग अनेक वेळा बदलायचे असेल तर ते करता येणे शक्य आहे. ती…
काही अपवाद परिस्थिती असेल तर असे करता येते व यासाठी तुम्हाला आधार ओळखपत्राच्या प्रादेशिक कार्यालयात संपर्क करावा लागतो.त्यासाठी तुम्हाला जास्तीचे बदल करायचे असेल तर आधार प्रादेशिक कार्यालय किंवा help@uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल व इमेल करावा लागेल.
तुम्हाला हे बदल का करायचे आहेत त्याचे कारण स्पष्ट करून संबंधित तपशील व व्यवस्थित पुरावे सादर करावे लागतात. तुम्ही दिलेले सगळे कारणे किंवा तुम्ही केलेले अपील योग्य वाटेल याची खात्री क्षत्रिय कार्यालयाला झाल्यास तुम्हाला याबाबत मान्यता देण्यात येते.
नक्की वाचा:मोठी बातमी! महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने दिली महत्वाची माहि
Share your comments