पैशांच्या बाबतीत बचत हे महत्त्वाचे असून लोकांना सगळ्यात जास्त काळजी ही त्यांच्या बचतीची असते. कारण कष्ट करून जमवलेली बचत कुठल्यातरी विश्वसनीय अशा योजनेमध्ये गुंतवण्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो व त्या माध्यमातून त्यांना चांगला परतावा मिळू शकेल अशी अपेक्षा असते. जर तुमच्याही मनात काही गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम योजनांविषयी माहिती घेऊ.
पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम गुंतवणूक योजना
1- ज्येष्ठ नागरिक बचत योजना- देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात फायदेशीर योजना असून या योजनेला पंचवार्षिक योजना मानली जाते. ग्राहकांना या योजनेत 7.4त्यानंतर व्याज दिले जाते आणि ज्येष्ठ नागरिकांना व्याजाच्या तिमाही आधारावर उत्पन्न मिळते. परंतु या योजनेचे खाते उघडण्यासाठी वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असावे.
2- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट- तुम्ही ही योजना एक ते पाच वर्षासाठी उघडू शकता. या योजनेत तुम्ही एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तसेच गुंतवणुकीची जास्तीची मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर वार्षिक साडेपाच टक्के ते 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.
3- बचत खाते- पोस्ट ऑफिसच्या योजनेत ग्राहकांना चार टक्क्यांपर्यंत चांगले व्याज दिले जाते. या योजनेत लोक पाचशे रुपयांच्या रोख रकमेतून खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला चेक बुक, एटीएम कार्ड, ई बँकिंग, मोबाईल बँकिंग, आधार सीडिंग, अटल पेन्शन योजना त्या दिवशी सुविधांचा लाभ दिला जातो.
4- मासिक उत्पन्न योजना- या योजनेत लोकांना 6.60 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. परंतु लक्षात ठेवा कि हा व्याजदर प्रत्येक आर्थिक वर्षानुसार बदलतो.
या योजनेत ग्राहक एक हजार रुपयासह त्यांचे खाते देखिल उघडू शकतात. या योजनेसाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आले आहेत. तुम्ही संयुक्त खात्यात साडेचार लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवू शकत नसल्यामुळे ही मर्यादा आता नऊ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत करा एकदाच गुंतवणूक,मिळतील दरमहा पैसे
Share your comments