देशातील अनेक लोकांना आपल्या परिवारासाठी एक शानदार कार खरेदी करायची असते. मात्र देशात 7 सीटर कार ची किंमत खूप अधिक असल्याने अनेक लोकांचे हे स्वप्न स्वप्नच राहते. परंतु देशातील अनेक अशा कंपन्या आहेतं ज्या कमी किमतीत सेव्हन सीटर कार उपलब्ध करून देत आहेत आज आपण अशाच कंपन्यांपैकी 2 गाड्यांची माहिती घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कमी किमतीत उपलब्ध असलेल्या सेव्हन सीटर कार.
Datsun Go Plus - मित्रांनो जर आपण स्वस्त 7 सीटर कार शोधत असाल, तर आज आम्ही आपल्यासाठी स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या गाड्यांची यादी घेऊन आलो आहोत. यामध्ये सर्वप्रथम, Datsun Go Plus ही गाडी आम्ही ठेवली आहे. या 7 सीटर कारची सुरुवातीची किंमत 4.25 लाख रुपये एवढी आहे. ही कार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सर्वात फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीचा लुक देखील खुपच अप्रतिम आहे. Datsun Go Plus मध्ये 1198cc चे 3 सिलेंडर SOHC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5000 Rpm वर 67 Hp ची पॉवर आणि 4000 Rpm वर 104 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते.
मारुती सुझुकी इको- मित्रांनो या 7 सीटर गाड्यांच्या यादीत आम्ही दुसर्या स्थानावर मारुती सुझुकी इको या गाडीस प्राधान्य दिले आहे. ही गाडी मारुती कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. मारुती सुझुकी इको ही कार 5 सीटर आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Maruti Suzuki Eeco ची सुरुवातीची किंमत 4.53 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे ही कार देखील मध्यमवर्गीय लोकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
या गाडीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 1196cc 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे आणि हे इंजिन 6000 Rpm वर 72.41 Hp पॉवर आणि 3000 Rpm वर 101 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. मारुती सुझुकी इको पेट्रोल गाडी 16.11 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनी करत असते, तर सीएनजी इको 21.94 किमी प्रति किलो मायलेज देऊ शकते.
Share your comments