भारतात सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत, म्हणून लोकं मायलेज वाली बाईक घेणे पसंत करत आहेत. भारतात काही टू व्हिलर गाड्या या मायलेज बरोबरच आपल्या विशिष्ट स्टाईलसाठी देखील ओळखल्या जातात. अशाच स्टायलिश आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या टू व्हिलर गाड्यांपैकी एक आहे हिरो पॅशन प्रो. ही गाडी कमी बजेट मध्ये उपलब्ध आहे, म्हणून ही मध्यमवर्गीयांची पहिली पसंती ठरत आहे.
हिरो पॅशन प्रो ही गाडी भारतात सर्वात जास्त खरेदी केल्या जाणाऱ्या टू व्हिलर गाड्यांचा यादीत येते. भारतात या गाडीची एक्स शोरूम प्राईस 70 हजार 375 ते 75 हजार 100 या दरम्यान आहे. जर आपल्याकडे टू व्हिलर खरेदी करण्यासाठी एवढा मोठा बजेट नसेल, पण आपणास टू व्हिलर गाडीची आवश्यकता असेल. चिंता करू नका आज आम्ही आपणासाठी एक विशेष ऑफर घेऊन आलो आहोत, त्याद्वारे तुम्ही अगदी कमी किमतीत ही टुविलर गाडी आपली बनवू शकता. मित्रांनो या ऑफर द्वारे तुम्ही ही टू व्हिलर गाडी केवळ निम्म्या किमतीत आपल्या नावावर करू शकता. मग तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे ना ही विशेष ऑफर. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विशेष ऑफर विषयी.
जर आपणास कमी बजेटमध्ये ही हिरो पॅशन प्रो गाडी हवी असेल तर आपल्याला ही गाडी बाइक24 या वेबसाईटवर कमी किमतीत उपलब्ध होऊन जाईल, मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बाईक्स ट्वेंटी फोर ही एक टू व्हीलर गाड्यांची माहिती देणारी एक प्रतिष्ठित वेबसाईट आहे, तसेच ही वेबसाईट आपणास सेकंड हॅन्ड टू व्हिलर गाड्या सुद्धा उपलब्ध करून देते. या वेबसाईटवर एक सेकंड हिरो पॅशन प्रो गाडी नुकतीच लिस्ट केली गेली आहे. त्यांनी या गाडीची किंमत केवळ पंचवीस हजार रुपये ठेवली आहे जी की तिच्या मुळ किमतीच्या निम्म्याहून कमी आहे.
वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, ही गाडी 2013 या वर्षाची आहे. म्हणजे ही गाडी आठ वर्षे जुनी आहे. ही गाडी आत्तापर्यंत केवळ एक हजार किलोमीटर पर्यंतच चालली आहे. ही गाडी फर्स्ट ओनर आहे, गाडीची पासिंग ही दिल्लीस्थित आहे. कंपनी या गाडीवर काही अटी व शर्ती लावून एक वर्षांची वॉरंटी सुद्धा देत आहे, तसेच या गाडीवर सात दिवसाची मनी बॅक गॅरंटी सुद्धा देण्यात आली आहे, म्हणजे जर आपण ही गाडी खरेदी केली आणि ती आपणास पसंत नाही पडली तर आपण सात दिवसाच्या आत तीला कंपनीला वापस करू शकता, मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यासाठी सुद्धा कंपनीच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्या की आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन वाचू शकता.
Share your comments