नोकिया ही फोन निर्माता कंपन्यांमध्ये अग्रगण्य कंपनी असून जर भारताला मोबाईल फोनची ओळख झाली असेल तर ती नोकिया कंपनीच्या माध्यमातूनच झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अगदी तुम्ही ग्रामीण भागातील किंवा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असा एकही व्यक्ती सापडणार नाही की त्याला नोकिया या कंपनीचे नाव माहिती नाही. स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रामध्ये अनेक अग्रगण्य आणि वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन या कंपनीने दिलेले आहेत
याच पार्श्वभूमीवर आता नोकिया फोन निर्माता कंपनी एचएमडी ग्लोबलने दोन फिचर फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. दीर्घ काळ चांगल्या कामगिरी करिता या फोनची निर्मिती करण्यात आली असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे फोन 34 दिवसांपर्यंत स्टॅन्ड बाय वर राहू शकतात असा देखील कंपनीने दावा केला आहे.
काय आहे या फोनची वैशिष्ट्ये?
नोकिया फोन निर्माता कंपनी एचएमटी ग्लोबलने नोकिया 130 म्युझिक आणि नोकिया 150 हे दोन फीचर फोन भारतीय बाजारामध्ये लॉन्च केले असून हे दीर्घकाळ उत्तम कामगिरी बजावू शकतील अशा पद्धतीचे त्यांचे वैशिष्ट्य आहेत.1450 mAh क्षमतेची यामध्ये रिमूव्हेबल बॅटरी असून युजर्स या फोनचा 20 तास कॉलिंग आणि तीस तास गाणे ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात.
हे दोन्ही फोन तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार असून ग्राहकांना ते अधिकृत रिटेल स्टोअर्स आणि Nokia.com वरून खरेदी करू शकणार आहेत.
कसा आहे नोकिया 150 फिचर फोन?
नोकिया 150 हा फोन आय पी 52 डस्ट आणि वॉटर स्टेन प्रूफ रेटिंग असलेला प्रीमियम डिझाईन फोन असून यामध्ये स्लिप डिझाईन मध्ये मेटालिक नेवीगेशन की देण्यात आली आहे. या फोनचा डिस्प्ले 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये 1450 mAh क्षमता असलेली काढता येण्यासारखी बॅटरी आहे.
चार एमबीची इंटरनल स्टोरेज असून ती 32 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. विशेष म्हणजे उत्तम फोटोग्राफी करिता या मोबाईल फोन मध्ये फ्लॅश लाईट सह 0.3 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच उत्तम कनेक्टिव्हिटी करिता यामध्ये मायक्रो यूएसबी(1.1) आणि ड्युअल बँड जीएसएम सिम पर्याय यामध्ये देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये दोन हजार कॉन्टॅक्ट नंबर आणि 500 संदेश स्टोरेज करण्याची क्षमता आहे. नोकिया 150 हा फोन चारकोल, सियान आणि रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नोकिया 130 म्युझिक फोनची वैशिष्ट्ये
नोकिया 130 मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्युशन 240×320 आहे व याची बॅटरी ही 1450 mAh क्षमतेची आहे. या फोनचे इंटरनल स्टोरेज हे चार एमबी असून 32 जीबी पर्यंत ते एक्सपॅन्डेबल आहे. या फोनमध्ये देखील 200 कॉन्टॅक्ट नंबर आणि 500 संदेश स्टोरेज करण्याची क्षमता असून हा फोन देखील डार्क ब्लू, पर्पल आणि लाईट गोल्ड या तीन रंगांमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.
किती आहे या दोन्ही फोनची किंमत?
नोकिया 150 या फोनची किंमत 2699 रुपये असून नोकिया 130 म्युझिक या फिचर फोनची किंमत १८४९ रुपये आहे.
Share your comments