आपण जर व्यवसाय करू इच्छित असाल, तसेच नोकरी व्यतिरिक्त आपणास साईड इन्कम हवा असेल, तर आज आम्ही विशेष आपल्यासाठी ह्या तीन व्यवसायाची भन्नाट कल्पना घेऊन आलो आहोत. हे तीन व्यवसाय करून आपण महिन्याकाठी हजारो रुपये कमवू शकता. आम्ही आपणास ज्या व्यवसाय बद्दल सांगणार आहोत ते व्यवसाय आपण राहत असलेल्या ठिकाणाहून देखील सुरू करता येऊ शकतात. तसेच हे व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास अगदी अल्प भांडवल लागणार आहे त्यामुळे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त नफा मिळवणारे हे बिजनेस ठरतील. आम्ही ज्या व्यवसाय बद्दल सांगणार आहोत, हे व्यवसाय आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती चालू शकतात. तसेच हे व्यवसाय महिला, नोकरी करणारे व्यक्ती, तसेच कॉलेजला जाणार विद्यार्थी कोणीही करू शकतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बिजनेस विषयी.
चॉक मेकिंग बिझनेस
चॉक अर्थात खडू बनवण्याचा व्यवसाय हा नेहमी चालणारा व्यवसाय आहे. खडू ची आवश्यकता शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना तसेच अनेक कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना असते. त्यामुळे या व्यवसायासाठी खूप मोठा स्कोप आहे असे सांगितले जाते तसेच हा व्यवसाय करून मोठी कमाई केली जाऊ शकते. चॉक मेकिंग बिझनेस हा आपण रहात असलेल्या ठिकाणाहून देखील करता येऊ शकतो शिवाय या बिझनेस साठी खूप कमी भांडवलाची आवश्यकता असते त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायासाठी जास्त मटेरिअलची आवश्यकता भासत नाही हा व्यवसाय केवळ दहा हजार रुपयात सुरू करता येऊ शकतो.आपण यामध्ये वाईट चॉक सोबतच रंगीत चोक देखिल बनू शकतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की चौक हा प्लास्टर ऑफ पॅरिस नामक पदार्थ पासून बनवला जातो प्लास्टर ऑफ प्यारीस हा एक प्रकारचा पावडर असते जे जीप्सम नावाच्या दगडपासून बनवले जाते.
बिंदी मेकिंग बिजनेस
अलीकडे बिंदी अर्थात टिकलीची मागणी बाजारात लक्षणीय वाढली आहे. आधी फक्त विवाहित स्त्रिया टिकली लावत असे पण आता मुली देखील टिकली लावणे पसंत करतात, त्यामुळे बिंदीची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे, आपण बिंदी मेकिंग बिझनेस सुरू करून चांगली मोठी कमाई करू शकता. हा व्यवसाय आपल्या घरातूनच सुरू करता येऊ शकतो, तसेच यासाठी जास्त भांडवलाची गरज भासत नाही. असे सांगितले जाते की बिंदी मेकिंग बिजनेस केवळ 12 हजार रुपयात सुरू करता येऊ शकतो आणि यातून महिन्याला हजारो रुपयांची कमाई होऊ शकते.
मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय
कैंडल मेकिंग बिझनेस सध्या खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे आधी कॅन्डल चा उपयोग केवळ लाईट गेल्यावरच केला जात असे पण अलीकडे बर्थडे सेलिब्रेशन साठी, लग्नाच्या वाढदिवसासाठी, तसेच कॅण्डल लाईट डिनरसाठी अशा वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या फंक्शनसाठी कॅन्डलचा उपयोग होऊ लागला आहे. त्यामुळे सध्या कॅन्डलची मागणी ही लक्षणीय वाढली आहे म्हणूनच कॅण्डल मेकिंग बिजनेस ची सुरुवात करून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. असे सांगितले जाते की कॅण्डल मेकिंग बिजनेस हा अवघ्या वीस हजार रुपयात सुरू करता येऊ शकतो.
Share your comments