DA Hike :- केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विचार केला तर त्यांच्या दृष्टीने महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता या मुद्द्यांना खूप महत्त्व आहे. जर आपण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सध्या त्यांना देण्यात येणारे सगळ्या प्रकारचे भत्ते हे सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात येत असून मार्च 2023 या कालावधीमध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करत तो 42% पर्यंत पोहोचवला होता.
तसेच एआयसीपीआय निर्देशांकाची जी काही आकडेवारी आहे ती देखील आता जून पर्यंतची उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जुलै 2023 पासून लागू होणारा महागाई भत्ता देखील आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकणार आहे व त्यामध्ये देखील चार टक्क्यांची वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची सध्याची स्थिती
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून लागू होणारा महागाई भत्ता देखील कर्मचाऱ्यांना आता मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता असून त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीच्या अंमलबजावणी ही एक जुलै 2023 पासून होणार आहे. साहजिकच आता जर महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर जे काही भत्ते आहेत त्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जर आपण इतर भत्त्यांचा विचार केला तर महागाई भत्त्यानंतर घरभाडे भत्ता अर्थातच एचआरएची देखील सुधारणा होऊ शकते. जर आपण या आधीची घरभाडे भत्यातील वाढ पाहिली तर जुलै 2021 मध्ये जेव्हा महागाई भत्ता 25% च्या पुढे गेला होता तेव्हा घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही घरभाडे भत्ता देण्यात येतो तो तीन श्रेणीमध्ये देण्यात येतो. त्या तीन श्रेण्या म्हणजे एक्स, वाय आणि झेड होय. जर आपण सध्याच्या घरभाडे भत्याचे दर पाहिले तर ते श्रेणीनुसार अनुक्रमे 27%, 18 आणि नऊ टक्के असे आहेत. परंतु या तुलनेत महागाई भत्ता सध्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून महागाई भत्ता सोबत आता घरभाडे भत्ता अर्थात एच आर ए मध्ये पुढील सुधारणा कधी होईल याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
सध्याची एचआरए मधील वाढ ही एक जुलै 2021 पासून लागू आहे. परंतु केंद्र सरकारने 2016 मध्ये जारी केलेल्या पत्रकानुसार महागाई भत्त्यातील वाढीसोबतच घरभाडे भत्यात देखील वेळोवेळी सुधारणा केली जाईल व त्यामुळेच शेवटची सुधारणा ही 2021 मध्ये करण्यात आली होती व आता पुढील सुधारणा 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.
तीन टक्क्यांनी वाढू शकतो घरभाडे भत्ता
एचआरए मधील पुढील सुधारणा तीन टक्के होईल. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना जो काही 27% घरभाडे भत्ता दिला जातो तो वाढून 30% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत असेल तेव्हाच घरभाडे भत्त्यात 30% पर्यंत वाढ होईल.
जर आपण या संबंधी विचार केला तर जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांची पातळी पार करेल तेव्हा घरभाडे भत्ता श्रेणीनुसार अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के इतका असणार आहे. म्हणजेच श्रेणीनुसार विचार केला तर एक्स श्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 30 टक्के, वाय श्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांकरता 18 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत आणि झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी तो नऊ टक्क्यांवरून दहा टक्के इतका वाढण्याची शक्यता आहे.
घरभाडे भत्याच्या बाबतीत असलेल्या एक्स, वाय आणि झेड श्रेणी म्हणजे काय?
जे कर्मचारी 50 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये राहतात ती श्रेणी एक्स या कॅटेगरीत येते. यामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 27% एचआरए मिळेल. त्यानंतर शहराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर वाय श्रेणीत शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 तर झेड श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के इतका घरभाडे भत्ता असेल.
Share your comments