नवी दिल्लीः आज देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यासह अनेक मोठ्या घोषणाही केल्या. यातली एक घोषणा म्हणजे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन. देशात आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरु होणार आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार आहे. या आयडीमध्ये आपली प्रत्येक टेस्ट, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधे दिली, केव्हा दिली, रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे.
काय आहे हे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन?
देशात आरोग्य सेवांना डिजिटल माध्यमांद्वारे लोकांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचलले आहे. आज पंतप्रधान मोदींनी आज नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) च्या सुरुवातीची घोषणा केली. या योजनेनंतर देशात रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा एका हेल्थ कार्डमध्ये येणार आहे. या माध्यमातून एक रेकॉर्ड देखील होणार आहे.
ही योजना नॅशनल हेल्थ एथॉरिटी अंतर्गत सुरु केली जाणार आहे. या मिशन अंतर्गत प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार आहे. या आयडीमध्ये आपली प्रत्येक टेस्ट, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधं दिली, केव्हा दिली, रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे.
काय असणार या योजनेत
- प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार.
- Digi डॉक्टर- यात सर्व डॉक्टरांची देखील यूनिक आयडी असेल आणि त्यांचीही माहिती असणार.
- हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री- यातून हॉस्पिटल, क्लिनिक, लॅबशी जोडले जाणार. यूनिक आयडी मिळणार, ज्यात आपण आपली माहिती अपडेट करु शकणार आहोत.
- पर्सनल हेल्थ रेकॉर्ड- यात लोकं आपली आरोग्य विषयक माहिती अपलोड किंवा स्टोअर करु शकतील.
- डॉक्टर आणि लॅबविषयी माहिती तसेच सल्ला देखील यात मिळेल.
- हेल्थ आयडी आणि पर्सनल हेल्थ रेकॉर्ड सिस्टमवर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी आयडी दिली जाणार. यात कुणाचंही पर्सनल हेल्थ रेकॉर्ड परवानगी शिवाय पाहू शकणार नाहीत.
Share your comments