आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांत पैकी एक आहे. कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी असो वा बँकेत खाते उघडणे असो आशा प्रत्येक कामात आधार कार्ड हे अनिवार्य आहे.या आधार कार्ड मध्येजन्मतारीख, मोबाईल नंबर, नावातील झालेल्या चुका अपडेट करता येतात
परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे लग्नानंतर स्त्रियास्वतःचे आडनाव बदलतात. त्यामुळे सदरील बदललेले आडनावे आधार कार्ड मध्ये देखील बदलणे आवश्यक असते. या लेखात आपण लग्नानंतर आधार कार्ड वरील आडनावात बदल कसा करावा? याबद्दल माहिती घेऊ.
लग्नानंतर आधार कार्ड वरील आडनावात बदल करण्याची पद्धत
- लग्नानंतर स्त्रीयांच्या आडनावात बदल होतो. सासर कडील आडनाव लग्नानंतर स्त्रीया लावतात.त्यामुळे आधार कार्ड मध्ये ही हा बदल करणे आवश्यक असते.
- आधार कार्ड मध्ये आडनावात बदल केल्यास तुमचे कोणत्याही प्रकारचे अतिमहत्वाचे काम रखडू शकते.
- आडनाव मध्ये बदल करणे हे कायदेशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही तुमचे आडनाव बदलू शकतात.
- लग्नानंतर तुमचा आडनावबदलण्यासाठी तुम्हाला राज्य सरकारकडे एक प्रतिज्ञापत्र दाखल करावी लागते. त्यानंतर त्याला संबंधित राज्य सरकारने मान्यता देणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्याजवळ तुमचे मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे जुने आडनावाचे कागदपत्र देखील सोबत असणे आवश्यक आहे.
- जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही राज्यसरकारच्या संकेतस्थळावरून कोर्ट मॅरेज फॉर्म डाऊनलोड करून तो व्यवस्थित भरून मॅरेज रजिस्ट्रारकडे जमा करा. यानंतर तुमची विवाह प्रमाणपत्र येईल व त्यानंतर नाव बदलण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नोटरी करावी लागते.
- तसेच तुम्हाला नाव का बदलायचे आहे याचे कारण देखील सांगावे लागते त्यानंतर साक्षीदाराच्या मदतीने स्टॅम्प पेपर वर तुमचे प्रतिज्ञापत्र केली जाते.
- कोर्टामध्ये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तुम्ही तुमच्या आडनाव बदलू शकता.
- या प्रतिज्ञा पत्रा व्यतिरिक्त तुमच्याकडे तुमचे जुनी आधार कार्ड म्हणजेच क्रमांक तसेच पतीचा आधार आणि इतर ओळख पत्रे तसेच रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे.
- हे सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्ही कुठल्याही आधार केंद्रावर जाऊ फक्त ते नाममात्र शुल्कात तुमचे तपशील बदलले जातील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार मध्ये आडनाव बदलू शकतात.
Share your comments