Petrol Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. महागाईच्या आघाडीवर पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum companies) दिलासा दिला आहे. सलग 84 वा दिवस आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होईना दिलासा मिळत आहे.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
भारतात लंपी त्वचा रोग कोठून आला, हा रोग झालेल्या जनावरांचे दूध पिऊ शकतो का? जाणून घ्या...
सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. देशात महागाई वाढतच आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत.
नोकरीला कंटाळलात! तर करा हा सुपरहिट व्यवसाय, नोकरी विसराल आणि कमवाल लाखो
भारीच की! तीन महिन्यांत 6 लाखांपर्यंत नफा, चिया बियांची लागवड करून शेतकरी होणार मालामाल
देशातील मुख्य शहरातील आजचे दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
महत्वाच्या बातम्या:
देशातील या राज्यांमध्ये कोसळणार दुसऱ्या टप्प्यातील मुसळधार पाऊस; जाणून घ्या IMDचा इशारा
सुवर्णसंधी! सोने मिळतंय 3700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर...
Share your comments