1. इतर बातम्या

आनंदाची बातमी! फक्त 5 हजार रुपये डाऊन पेमेंट वर आता मिळणार हिरो एचएफ डीलक्स बाईक; जाणून घ्या याविषयी

देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी म्हणून विख्यात असलेली हीरो मोटोकॉर्पने होळीच्या आधीच होळीची ऑफर देशातील जनतेसाठी आणली आहे. हिरो मोटोकोर्प देशातील अग्रगण्य मोटार कंपन्यांपैकी एक आहे, हिरो कंपनी आपली सर्वात जास्त विक्री होणारी हिरो एचएफ डीलक्स बाईकवर एक बंपर ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने आपल्या हॉट सेलिंग गाडीवर एक भन्नाट ऑफर आणली आहे याद्वारे हीरो एचएफ डिलक्स अवघ्या 5 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वर ग्राहकांना दिली जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हिरो कंपनीने ही ऑफर काही मर्यादित कालावधी पर्यंतच दिली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Bikes

जर आपणास हिरो कंपनीची ही शानदार हिरो एचएफ डीलक्स गाडी विकत घ्यायची असेल तर आपल्या जवळच्या डीलर सोबत एक वेळ अवश्य या ऑफर विषयी विचारणा करा. कंपनी हिरो एचएफ डीलक्स ही बाईक फक्त 4 हजार 999 रुपये एवढ्या कमी डाऊन पेमेंट मध्ये ग्राहकांना देत आहे शिवाय आपणास यावर लो कॉस्ट ईएमआय देखील देण्यात येणार आहे. हिरो एचएफ डीलक्स ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त सेल होणारी गाडी आहे.

हॉट सेलिंग बाईक आहे हिरो एचएफ

मागील महिन्यात संपूर्ण देशात हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस बाइक सर्वात जास्त विक्री झाली होती, ही बाईक मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत बनत आहे. स्प्लेंडर प्लस बाइक मागच्या महिन्यात सव्वादोन लाख लोकांनी खरेदी केली.

या दमदार गाडी नंतर मायलेज साठी ओळखली जाणारी हिरो एचएफ डीलक्स बाईक सर्वात जास्त विकली गेली, या गाडीला देशातील जवळपास दीड लाख लोकांनी खरेदी केली. हिरो एचएफ डीलक्स हि जरी देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाईक्स च्या यादीत दुसर्‍या स्थानी असली तरीदेखील या बाईकला कधीकाळी हिरोची भागीदारी असलेली कंपनी होंडा कंपनीची सीबी शाइन मोठी टक्कर देत आहे.

हीरो एच एफ डिलक्स बाईक स्प्लेंडर नंतर सर्वात जास्त विक्री होणारी बाईक आहे, या बाईकला मध्यमवर्गीय लोक जास्त पसंती दर्शवीत आहेत.

ही बाईक 83 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत चे मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे, म्हणूनच ही बाईक खरेदी करण्यासाठी मध्यमवर्गीय लोकांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे. जर आपणासही ही दमदार मायलेज वाली बाईक खरेदी करायची असेल, तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या हिरो कंपनीच्या डीलरशिपशी संपर्क साधून या विशेष ऑफर विषयी अवश्य विचारणा करा.

English Summary: The Hero HF Deluxe bike will now be available on a down payment of just Rs 5,000; Learn about it Published on: 16 February 2022, 08:56 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters