भारताचे ऊर्जामंत्री राजकुमार सिंह यांनी शुक्रवारी ग्राम उजाला योजना लॉन्च केली. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या योजनेअंतर्गत केवळ दहा रुपयात एलईडी बल्ब मिळणार आहे. यायोजनेचा उद्देश आहे की भारतातील अंधार नाहीसा करणे हा होय.
कन्वर्जन्स एनर्जी सर्विस लिमिटेड तर्फे या योजनांतर्गत पहिल्या टप्प्यात दीड कोटी बल्ब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही कंपनी एनेर्जी एफीसन्सी सर्विसेस लिमिटेडची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. एनेर्जी इफिसयन्सी सर्विसेस लिमितेड म्हणजेच ई इ एस एल जगातील सगळ्यात मोठी एनर्जी सर्विस कंपनी असून याची शंभर टक्के भागीदारी भारत सरकारकडे आहे.
या योजनेविषयी माहिती
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सात आणि बारा व्हॅटचे एलईडी बल्ब उपलब्ध केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील वाराणसी, विजयवाडा, महाराष्ट्रातील नागपूर आणि पश्चिम गुजरात मध्ये काही जिल्ह्यात बल्ब उपलब्ध केले जाणार आहेत. या दिल्या जाणाऱ्या बल्ब ची वारंटी तीन वर्षाचे असेल तसेच हे बल्ब केवळ ग्रामीण भारतात उपलब्ध केल्या जाणार आहेत.
भारताचा विचार केला तर भारतात अजूनही तीस कोटींहून अधिक पिवळे बल्ब आहे. या बल्बला एलईडी बल्ब ची रिप्लेस केल्यास दरवर्षी 40 हजार 743 मिल्लियन किलोवॅट ऊर्जेची बचत होईल.
Share your comments