रेशन कार्ड धारकांसाठी (ration card holders) केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. आता केंद्र सरकारकडून 'अंत्योदय रेशन कार्ड' ('Antyodaya Ration Card') धारकांना खूशखबर दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अंत्योदय कार्ड धारकांचे आयुष्य बदलणार आहे.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना अंत्योदय रेशन कार्ड मिळते. या कार्डवर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला कमी किमतीमध्ये जीवनावश्यक अन्नधान्य पुरविले जाते. कार्डधारकांना ३५ किलो ग्रॅम गहु आणि तांदुळ प्रतिकिलो २ आणि ३ रुपये दराने उपलब्ध करून दिला जातो.
मात्र आता केंद्र सरकारने अंत्योदय कार्ड धारकांना मोफत उपचारांसाठी आयुष्मान कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अंत्योदय रेशन कार्ड धारकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी सरकारकडून जिल्हा आणि तालुका स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रांवर विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच सरकारने जनसुविधा केंद्रांवर ही सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा: कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
रेशन कार्ड दाखवून जनसुविधा केंद्रावर आयुष्मान कार्डसाठी अर्ज करता येऊ शकतो. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्व अंत्योदय कार्ड धारकांसाठी आयुष्मान कार्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हे अभियान जिल्हा स्तरावर २० जुलैपर्यंत राबविण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
आतापर्यंत सर्व अंत्योदय कार्डधारकांजवळ आयुष्मान कार्ड आलेले नाही, असे कार्डधारक २० जुलैपर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पात्र लाभार्थी जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनलशी संबंधित खासगी रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये आपले अंत्योदय कार्ड दाखवून आपल्या कुटुंबाचं आयुष्मान कार्ड तयार करू शकता.
हे ही वाचा: मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ
महत्वाचे म्हणजे सध्या केंद्र सरकारकडून नवे आयुष्मान कार्ड तयार करण्यात आलेले नाही. ज्या लाभार्थ्यांचं नाव आधीपासून योजनेमध्ये आहे. केवळ त्यांनाच विभागाकडून कार्ड्स वितरित केले जाणार आहेत.
आयुष्मान कार्डचा फायदा
कोणत्याही अडचणीच्या वेळी अंत्योदय कार्ड धारकांना उपचारांसाठी रुग्णालयात भटकावे लागू नये. त्यामुळे शासन स्तरावर यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा: Village Business Ideas: गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 कल्पना; भरपूर नफा मिळणार..
Share your comments