सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रचंडा से वाढ झाल्याने बऱ्याचशा ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी तसेच इलेक्ट्रिक कार बाजारात येऊ लागले आहेत. इलेक्ट्रिक कार सोबतच सीएनजी कार देखील घेण्याकडे बरेच ग्राहकांची पसंती दिसून येत आहे.
परंतु इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार मधील नेमके फायदे तोटे आणि फरक माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार चे फायदे तोटे आणि फरक जाणून घेऊ.
इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार चे फायदे आणि तोटे
जर वर्षभराचा विचार केला तर इलेक्ट्रिकल सीएनजी वर चालणाऱ्या कारच्या विक्री मध्ये खूप वाढ झाली आहे.इलेक्ट्रिक कार ची विक्री अजूनही एकूण वाहनांच्या तुलनेत कमी असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेल कार च्या तुलनेत सीएनजी कार चालवण्यासाठी खर्च कमी आहे तर इलेक्ट्रिक कार साठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. या दोन्ही प्रकारच्या कारमध्ये काही फायदे आणि तोटे आहेत.
सीएनजी कार चे फायदे
सीएनजी कार चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे पेट्रोल आणि डिझेल वरच अवलंबित्व संपत. अगदी कमीत कमी खर्चा मध्ये आपण प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. अलीकडे सीएनजीच्या किमतीमध्ये थोडी वाढ झाली असली तरी पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत खूपच कमी आहे. जर तुलना करून पाहिली तर पेट्रोलची किंमत पंच्याण्णव रुपयांच्या पुढे आहे तर सीएनजी ची किंमत 53 रुपये आहे. तसेच कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या सीएनजी संपल्यावर अडचणी येऊ नयेत यासाठी पेट्रोल डिझेल व सीएनजी कार चालवण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देतात.
सीएनजी कारचे तोटे
सीएनजी कार फायदेशीर असली तरी अजूनही तुलनेने देशातील लोकांचा कल सीएनजी कार वापरण्याकडे कमी आहे. मध्ये सीएनजी स्टेशनची खूपच कमतरता आहे. बऱ्याच शहरांमध्ये अजूनही सीएनजी स्टेशन नाहीयेत. तसेच कार मध्ये बऱ्याच काळापर्यंत सीएनजी वापरल्याने वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होतो. पेट्रोल-डिझेलच्या वापरताना कारची आउटपुट असतं त्या तुलनेत सीएनजी मुळे पावर आउटपुट दहा टक्क्यांनी कमी होते.
इलेक्ट्रिक कार चे फायदे
देशातील अनेक राज्यांनी स्वतःचे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे त्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांना अलीकडच्या काळात अधिक गति दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरण ग्राहकांना पेट्रोल-डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहित करणारे आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कोणतेही आरटीओ शुल्क किंवा रस्ते कर भरावा लागत नाही.इलेक्ट्रिक वाहन चालवणे देखील फायदेशीर आहे.इलेक्ट्रिक कारला एक किलो मीटर चालविण्याचा खर्च अवघा एक रुपया पेक्षा कमी असतो. सीएनजी कारच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे.तसेच या कारचा मेंटेनन्स देखील कमी आहे तसेच इलेक्ट्रिक कार मुळेशून्य उत्सर्जन होते त्यामुळे जगभरात या कारलापसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक ची किंमत सामान्य कारच्या तुलनेत खूपच जास्त असल्याने तसेच इलेक्ट्रिक दुचाकी सुद्धा त्यांच्या आय सी इ च्या तुलनेत खूप महागआहेत.
इलेक्ट्रिक वाहन मध्ये वापरले जाणारे बॅटरी ची किंमत खूपच जास्त असल्याने या गाड्या महाग आहेत. अजूनही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची देशात कमतरता आहे त्यामुळे या गाड्या वापरणाऱ्यांना चार्जिंग स्टेशन शोधणं खूपच कठीण काम आहे.बरेच एलेक्ट्रिक वेहिकल सिंगलचार्जिंगवर 400 किमी पेक्षा कमी रेंज देतात. त्यामुळे लॉंग ड्राईव्ह करणाऱ्या कार मालकांचे पुरेशी तयारी नसेल तर असा प्रवास त्यांना जोखमीचे ठरू शकतो.(स्रोत-News18लोकमत )
Share your comments