मुंबई- तंत्रज्ञानाचा वापरातून आपलं आयुष्य सुकर बनलं आहे. गावखेड्यातील माणूस जगाच्या व्यवहाराशी जोडला जात आहे. तंत्रज्ञानाचे सामर्थ्य जाणून अनेकांना अर्थप्राप्तीचं नव साधन गवसलं आहे. यू-ट्यूब(You tube) हा अनेकांसाठी कमाईचं नव माध्यम ठरलं आहे. शेतकरी आपल्या बांधावर बसून यू-ट्यूबच्या सहाय्याने आपल्या शेतातील प्रयोग जगासमोर मांडू शकतात. यातून केवळ माहितीचा प्रसार होणार नाही तर शेतकऱ्यांना बक्कळ कमाईही डॉलरमध्ये (doller) करता येईल.
झिरो भांडवलात यू-ट्यूबवर हिरो ठरण्याची शेतकऱ्यांसाठी अनोखी पर्वणी आहे. आपल्या हातात असलेल्या मोबाईलच्या सहाय्याने अनेक जण ग्रामीण भागात कमाईच्या संधी शोधू लागले आहेत. अशा सर्वांसाठी विना भांडवलात कमाई सशक्त साधन यू-ट्यूब नक्कीच ठरत आहे.
यू-ट्यूब म्हणजे काय?
गूगलवरील (google) व्हिडिओ स्वरुपातला जगप्रसिद्ध प्लॅटफॉर्म म्हणजे यू-ट्यूब. शिक्षण, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास पासून बालकांचे संगोपन अशा विविध विषयांवरील कंटेट आपल्याला यू-ट्यूबवर पाहायला मिळतो. आपलं जे हवं ते सारं काही एका सर्चवर यू-ट्यूब वर उपलब्ध आहे.
कसे कमवाल डॉलर?
आपल्या व्हिडिओत वैविध्य असल्यास सर्वांना नक्कीच पसंतीस पडतील. सर्वाधिक सबस्क्राईब (subscribe) आणि व्हूव्ज (views) वाढल्यानंतर कमाईला सुरुवात होते. आपलं चॅनेल मॉनिटाईज होणं यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. याविषयी तुम्हाला टप्पाटप्यानं नक्कीच माहिती मिळेल. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या जवळील प्रॉडक्टची जाहिरात देखील या माध्यमातून करू शकतात. स्वत:चे प्रॉडक्ट विकून लाखो रुपयांची कमाई करा.
Share your comments