आपण आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात नोटा चलनात आणत असतो. सरकार डिजिटल पेमेंट साठी संपूर्ण देशात वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. असे असले तरी, आलेली सवय मेल्याशिवाय जात नाही या म्हणीप्रमाणे अजूनही देशात डिजिटल पेमेंट लोकांद्वारे मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण देशात रोखीचे व्यवहार अधिक नजरेस पडतात, रोखीच्या व्यवहारात सर्वात जास्त नोटांचा वापर होतो. व्यवहार करताना अनेकदा आपल्याकडे फाटलेली नोट येते किंवा आपल्या हातून चुकून नोट फाटून जाते.
जर आपल्या कडेही अशा प्रकारच्या फाटलेल्या नोटा असतील तर चिंता करू नका आता फाटलेल्या नोटा देखील बँकेद्वारे बदलता येऊ शकतात यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने नियम बनवलेले आहेत. जर एखाद्या बँकेने फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नकार दिला तर त्याची तक्रार आपण करू शकता. आज आपण आपल्या नोटा कशा बदलायच्या आणि एखाद्या बँकेने बदलून नाही दिल्या तर तक्रार कुठे करायची याविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने बनवलेल्या कायद्यानुसार आपण फाटलेल्या नोटा सहज रित्या बँकेद्वारे बदलून घेऊ शकता. यासाठी आपणास बँकेला कुठलाही अतिरिक्त निधी द्यावा लागत नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासाठी विशेष अशा मार्गदर्शक सूचना बँकांना तसेच नागरिकांना जारी केल्या आहेत. फाटलेल्या नोटा देशातील कुठल्याही बँकेतून बदलल्या जाऊ शकतात यासाठी आपले खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे उंबरठे झिजवण्याची आवश्यकता नाही.
जर आपण फाटलेल्या नोटा बँकेत बदलवण्यासाठी केली आणि बँकेने स्पष्ट नकार दिला तर आपण त्या बँके विरुद्ध तक्रार देखील नोंदवू शकतो. मात्र असे असले तरी, जर आपली नोट जास्त फाटलेली असेल तर आपणास त्या नोटाच्या मूल्यापेक्षा कमी पैसे मिळणार आहेत.
- आपल्याकडे जर पाच दहा वीस पन्नास या किमतीच्या नोटा असतील आणि त्या 50% जैसे थे म्हणजे सुरक्षित असतील तर याच्या बदल्यात आपणास नवीन नोट दिली जाऊ शकते. म्हणजे आपल्याला जेवढ्या किमतीच्या आपल्या नोटा असतील तेवढी रक्कम बँकेद्वारे अदा केली जाऊ शकते.
- जर फाटलेल्या नोटांची संख्या 20 पेक्षा अधिक असेल तसेच फाटलेल्या नोटांचे एकूण मूल्य पाच हजारपेक्षा अधिक असेल तर बँकेला आपणास काही फी देखील अदा करावी लागणार आहे.
- जर आपल्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटांवर सेक्युरिटी साईंन असेल अर्थात सीरियल नंबर गांधीजींचे वॉटरमार्क गव्हर्नरच्या हस्ताक्षर इत्यादी सुस्थितीत असेल तर कुठलीही बँक अशा फाटलेल्या नोटा चेंज करून देण्यास मनाई करणार नाही.
- जर आपल्याकडे असलेली नोट जास्त प्रमाणात वाढलेली असेल तर यासाठी आपणास रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे अशी नोट सुपूर्द करावी लागणार आहे यासाठी आपणास पोस्टाने फाटलेली नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवावी लागणार आहे. यामध्ये आपणास आपला अकाउंट नंबर, नोट किती किमतीची आहे, तसेच आपला आयएफसी कोड दर्ज करावा लागणार आहे.
- आरबीआय कडे प्राप्त होणाऱ्या सर्व फाटलेल्या नोटा आरबीआय चलन बाह्य करत असतो. या नोटांच्या बदल्यात आरबीआयकडून नवीन नोटा छापल्या जातात, या फाटलेल्या नोटांचे बारीक बारीक तुकडे करून रिसायकलिंग केले जाते व परत पुन्हा कागद बनविण्यासाठी पाठवले जातात.
Share your comments