प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याकडे चारचाकी असावी.आपणही आपल्या कुटुंबाने चारचाकीने प्रवास करावा अशी दुर्दम्य इच्छा प्रत्येकाच्या मनात असते.परंतु जर कारच्या किमती पाहिल्या तरअगदी परवडणार नाहीत अशा असतात.
परंतु वाहन उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा मोटर्स ग्राहकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्याच्या बाबतीत नेहमी पुढेअसते.याच टाटा मोटर्सने आतासर्वसामान्य ग्राहकांना परवडेलअशा किमतीत आणि भरगच्च सूट देऊ करत कार खरेदी करण्याची संधी दिली आहे. या सवलतीमध्ये जवळजवळ टाटाच्या अनेक वाहनांवर 85 हजार रुपयांपर्यंत सूट असल्याने याचा फायदा ग्राहकांना घेता येऊ शकतो.यासोबतच एक्सचेंज बोनस,सवलती अंतर्गत रॉक सवलत आणि कार्पोरेट ऑफर देखील उपलब्ध आहेत. या लेखात आपण टाटा मोटर्सच्या कोणत्या कार्ड वर किती डिस्काउंट मिळतो याची माहिती घेऊ.
या आहेत टाटा मोटर्सच्या सवलतीच्या दरात मिळणाऱ्या कार्स
- टाटा सफारी- टाटा कडून या एस यू व्ही वर साठ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात असून या सात आसनी एस यू व्ही ची किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते तर 23.29लाख रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये 2.0लिटर डिझेल इंजन मिळते जे 6-speed मॅन्युअल आणि 6-speed ऑटोमॅटिक गेअर बॉक्सशी जोडलेले आहे.
- टाटा हॅरिअर- या मध्यम आकाराच्या एसयूव्ही कार वर घसघशीत 85 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये सात हजार रुपयांचा वैयक्तिक लाभ आणि 25 हजार रुपयांचा कार्पोरेट लाभ समाविष्ट आहे.
- टाटा नेक्सन- टाटाची ही कार फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एस यु वी ठरली आहे.मार्चमध्ये या कारवर 25 हजार रुपयांपर्यंत सूट आहे.
- टाटा टियागो-टाटा टियागो ही कंपनीच्या टाटा टिगोर ची हॅचबॅक आवृत्ती आहे.यामध्ये इंजिन आणि फीचर्स ही सारखेच आहेत. या कारवर तीस हजार पर्यंत सूट मिळवूनटिगोरघेऊशकता. या कारमध्ये 1.2 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजन मिळते जे 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटीशी जुळते.
Share your comments