जेव्हा आपण व्यवसायाच्या शोधात असतो किंवा एखादा व्यवसाय करावा अशी मनामध्ये इच्छा असते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये अनेक व्यवसाय कल्पना येत असतात व त्या ठिकाणीच आपण नेमके गोंधळून जातो. दुसरी गोष्ट व्यवसाय सुरू करताना सगळ्यात प्राधान्याने पुढे येते ती म्हणजे लागणारी गुंतवणूक होय. हीदेखील गोष्ट तेवढेच महत्त्वाचे असते. व्यवसाय पाहायला गेले तर अगदी छोटे-मोठे व्यवसाय असतात परंतु त्यांना बाजारपेठेत किंवा एकंदरीत समाजात मागणी किती आहे हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे असते.
या सगळ्या गोष्टींवर आपण विविध लेखांच्या माध्यमातून व्यवसाय कल्पना पाहत असतो. अशीच एक पोस्ट ऑफिस सोबत व्यवसाय करता येईल अशी कल्पना आपण या लेखात पाहणार आहोत.
नक्की वाचा:Bussiness Idea: नासलेल्या दुधाचा असाही करा उपयोग, बनवा 'हे' दोन पदार्थ अन कमवा भरपूर नफा
करा पोस्ट ऑफिस सोबत व्यवसाय
आपल्याला माहित आहेच की भारतामध्ये खूप प्रमाणात पोस्ट ऑफिस असून त्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधांचा विस्तार केंद्र सरकारने केला आहे. यामध्ये आपण पोस्ट ऑफिस चा विचार केला तर स्टॅम्प तसेच वेगळे स्टेशनरी पाठवणे,
मनिऑर्डर पाठवणे किंवा छोटी बचत खाते उघडणे इत्यादी कामे पोस्ट ऑफिस मध्ये केली जातात. या कामांमध्ये सुलभीकरण यावी यासाठी भारतीय पोस्ट खात्याने फ्रॅंचाईझी योजना सुरू केले आहे.
म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या सहकार्याने आपण पोस्ट ऑफिस उघडून पैसे कमवू शकतात. कारण देशात बऱ्याच भागांमध्ये अजून देखील पोस्ट ऑफिसचा हवा तेवढा विस्तार नाहीये आणि ही समस्या लक्षात घेऊन फ्रॅंचाईजी दिली जात आहे.
यामध्ये दोन प्रकारच्या फ्रेंचायसी दिल्या जातात. पहिली म्हणजे आउटलेट आणि दुसरी म्हणजे पोस्टल एजन्टची होय.
तुम्ही या दोघांपैकी कोणतीही एक फ्रॅंचाईजी घेऊ शकता. एवढेच नाही तर बऱ्याच शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घरोघरी पोस्टल स्टॅम्प स्टेशनरी पोहोचवणारे एजंट पोस्टल एजंट फ्रॅंचाईजी म्हणून ओळखले जातात. या योजनेअंतर्गत तुम्ही एकदा थोडीशी रक्कम जमा करून आणि काही नियमांचे पालन करुन पोस्ट ऑफिस उघडू शकतात.
या व्यवसायासाठी लागणारी पात्रता
यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व घरातील कुठलाही सदस्य पोस्ट खात्यात नसावा. जर आपण यामध्ये शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर कुठल्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून फ्रॅंचाईजी साठी अर्ज करावा लागतो व निवड झाल्यावर पोस्ट ऑफिससोबत एक सामंजस्य करार करावा लागतो. यामध्ये तुम्हाला एक सुरक्षा रक्कम म्हणून म्हणजेच डिपॉझिट पाच हजार रुपये भरावी लागते.
परंतु तुम्हाला पोस्टला एजंट फ्रॅंचाईजी घ्यायचे असेल तर त्यासाठी थोडी अधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला स्टेशनरी वस्तूंच्या खरेदीसाठी थोडा जास्त पैसा खर्च करावा लागतो. तसेच यासाठी तुम्हाला दोनशे स्केअर फुट ऑफिससाठी जागा निवडणे आवश्यक आहे.
नक्की वाचा:Bussiness Idea: शेतीवर आधारित 'हा' उद्योग उभारा आणि कमवा प्रचंड नफा,व्हा उद्योजक..!
Share your comments