स्टेट बँक ऑफ इंडिया हे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका असून या बँकेचे सगळ्यात जास्त ग्राहक आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया ही ग्राहकांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी कायम तत्पर असते.
ग्राहकांना विविध सेवा अगदी सोप्या पद्धतीने आणि आरामदायी कशा पद्धतीने देता येतील याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमी प्रयत्नशील असते.
याचाच एक भाग म्हणून आता स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक नवीनच सुविधा आणली असून एसबीआयच्या पाच मोठ्या सुविधा आहेत ते आता स्टेट बँकेच्या ग्राहकांना अवघ्या त्यांच्या मोबाईलवर मिळू शकणार आहेत.
याबाबतची माहिती स्टेट बँकेने ट्विट करून दिली आहे. यासाठी बँकेने एक क्रमांक जारी केला असून त्यावर कॉल करून ग्राहक सेवेशी संबंधित सुविधा मिळवू शकतात.बँकेच्या संबंधित कामांसाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही.
यासाठी बँकेने अलीकडेच दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या नंबर वर कॉल करून तुम्ही बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे अगदी सुट्टीच्या दिवशी देखील टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुमचे काम करून घेता येऊ शकते.
बँकेने जारी केले हे नंबर
स्टेट बँकेने ग्राहकांसाठी दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत त्यातील पहिला म्हणजे 1800 1234 आणि 1800 2100 वर कॉल करून बँकेचे संबंधित कामाचा निपटारा करता येणे शक्य आहे. या दोन टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने पाच महत्त्वाची कामे केले जाऊ शकतात. ते म्हणजे….
1- तुमच्या खात्याची शिल्लक आणि शेवटचे पाच व्यवहारांची डिटेल्स
2- एटीएम कार्ड ब्लॉकिंगची स्टेटस आणि एटीएम कार्ड डिस्पॅच
नक्की वाचा:उत्तम व्यवसाय:पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाईन विक्री करा, दर महिन्याला होईल बंपर कमाई
3- जर तुम्ही तुमचे जुने एटीएम कार्ड ब्लॉक केले तर नवीन एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट
4- चेक बुक पाठवण्याची स्थिती
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा टीडीएस ची डिटेल आणि ई-मेल द्वारे ठेव प्रमाणपत्र
याबाबतीत स्टेट बँकेने म्हटले आहे की, कृपया SBI 24×7 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा उदा.1800 1234( टोल फ्री ),1800 4253800( टोल फ्री ),1800 2100( टोल फ्री ) वर देशात सर्व लँडलाईन आणि मोबाईल फोनवरून टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.
Share your comments