देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण ऑफर आपल्या ग्राहकांसाठी कार्यान्वित केली आहे. यामुळे देशातील तमाम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी दोन लाख रुपये देण्याची योजना अमलात आणत आहे. रूपे डेबिट कार्ड वापरणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व जण जनधन खातेधारकांना दोन लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे, हे दोन लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे ॲक्सिडेंटल कव्हर म्हणुन देणार आहे. काय आहे ॲक्सिडेंटल कव्हर? जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
कसे मिळणार दोन लाख रुपयाचे एक्सीडेंटल कव्हर
बँक ऑफ इंडिया कडून जनधन खाते धारकांना अकाउंट ओपनिंगच्या कालावधीनुसार ॲक्सिडेंटल इन्शुरन्स ची रक्कम ठरवली जाणार आहे. ज्या ग्राहकांनी प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत 28 ऑगस्ट 2018 पर्यंत आपले जनधन खाते ओपन केले आहे त्यांना रूपे पीएमजेडीवाय या कार्डावर एक लाख रुपयांपर्यंतची इन्शुरन्स रक्कम पुरवली जाणार आहे याशिवाय 28 ऑगस्ट 2018 नंतर रूपे कार्ड ज्या व्यक्तींना मिळाले असेल त्यांना दोन लाख रुपया पर्यंत एक्सिडेंटल कव्हर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ॲक्सिडेंटल कव्हर ची रक्कम कार्ड धारकांच्या मृत्यूपश्चात दिली जाणार आहे.
कोणत्या लोकांना मिळणार आहे याचा फायदा
प्रधानमंत्री जनधन योजना ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे देशातील गरीब नागरिकांना झिरो बॅलन्स वरती बँक अकाउंट ओपन करून देण्यात आले आहे हे बँक अकाउंट पोस्ट ऑफिस च्या बँकेत तसेच देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ओपन करून देण्यात आले आहे प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा सरकारद्वारे देण्यात येतात. यासाठी कोणताही व्यक्ती केवायसी साठी लागणारे डॉक्युमेंट जमा करून ऑनलाईन पद्धतीने अथवा बँकेत प्रत्यक्षरीत्या भेट देऊन आपले जनधन खाते खोलू शकतो एवढेच नाही जर एखाद्या व्यक्तीला आपले रेगुलर सेविंग अकाउंट जनधन अकाउंट मध्ये कन्व्हर्ट करायचे असल्यास ते देखील केले जाऊ शकते या खातेधारकांना बँकेकडून रूपे डेबिट कार्ड प्रोव्हाइड केले जाते या डेबिट कार्डचा वापर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स समवेतच अनेक दुसऱ्या सुविधांसाठी करण्यात येतो.
जनधन खाते धारकांना रूपे डेबिट कार्ड अंतर्गत एक्सीडेंट इन्शुरन्सचा फायदा तेव्हा मिळेल जेव्हा जनधन खाते धारकाने अपघात होण्याच्या नव्वद दिवस अगोदर इंट्रा अथवा इंटर बँक दोघांपैकी कुठल्याही माध्यमातून एखादा यशस्वी बँकिंग व्यवहार केला असेल अशा स्थितीतच ॲक्सिडेंटल इन्शुरन्स ची रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जाणार आहे.
ॲक्सिडेंटल इन्शुरन्स अंतर्गत फायदा मिळवण्यासाठी कार्ड धारकांचा मृत्यू झाल्यास सर्वप्रथम क्लेम फॉर्म भरणे आवश्यक असणार आहे. यासोबतच ओरिजनल डेथ सर्टिफिकेट अथवा त्यासंबंधी तत्सम दस्तऐवज जोडावे लागणार आहे याशिवाय एफआयआरची ओरिजनल कॉफी देखील जोडावी लागणार आहे पोस्टमार्टम चा रिपोर्ट अथवा त्यासंबंधी एखादा वैध रिपोर्ट जोडणे अनिवार्य असणार आहे. याव्यतिरिक्त लागणारे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्डचे झेरॉक्स तसेच बँकेच्या स्टॅम्प पेपर वर खाता धारक जवळ रूपे कार्ड असल्याबाबत एक शपथ पत्र हे सर्व डॉक्युमेंट 90 दिवसांच्या आत जमा करणे अनिवार्य असणार आहे. याव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉमिनीचे नाव आणि नॉमिनीचे बँकिंग डिटेल, त्याची पासबुकची झेरॉक्स कॉपी यासोबत जोडावी लागणार आहे.
यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
मृत्यु प्रमाणपत्र
इन्शुरन्स क्लेम फॉर्म
तसेच वारसदाराचे आधार कार्डचे झेरॉक्स
जर खाते धारकाचे अर्थात ॲक्सिडेंटल इन्शुरन्स प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू दुसऱ्या कारणाने झाला असेल तर रासायनिक विश्लेषणाचा अथवा पीएसएल रिपोर्ट त्यासोबत पोस्टमार्टम चा रिपोर्ट जोडावे लागणार आहे.
अपघाताचा तपशील असणारा एखादा पोलीस रिपोर्ट
रूपे कार्ड देणाऱ्या बँकेकडून बँक स्टॅम्प द्वारे दिले जाणारे घोषणापत्र
यामध्ये बँक अधिकारीचे नाव तसेच ई-मेल आयडी आणि संपर्काचा तपशील असणे अनिवार्य असणार आहे.
Share your comments