1. इतर बातम्या

Village Business: गावात राहून सुरु करा "हे" व्यवसाय कमाई होणार लाखो रुपयात

मित्रांनो सध्या अनेक सुशिक्षित तरुण व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत असतात, मात्र त्यांना योग्य ती माहिती मिळत नसल्याने ते व्यवसाय करण्यापासून वंचित राहतात. आपल्या देशात निम्म्याहून अधिक जनसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास असते. या एवढ्या मोठ्या जनसंख्या पैकी सर्वात जास्त जनसंख्या ही तरुणांचीच आहे. आणि ग्रामीण भागातील तरुणांना देखील व्यवसाय करण्याची आवड असते मात्र त्यांना बिझनेसविषयी माहिती नसते, त्यामुळे आज आम्ही विशेषतः ग्रामीण भागात सुरू करता येणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती घेऊन आलो आहोत. आपण हे व्यवसाय अगदी अल्प भांडवलात सुरू करू शकता, आणि यातून चांगली मोठी कमाई करू शकता. जर आपणही ग्रामीण भागात वास्तव्यास असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आपण देखील हे व्यवसाय करून चांगली कमाई करू शकतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
village business idea

गावात सुरू करता येणारे व्यवसाय

वेल्डिंग आणि फॅब्रिकेशनचा बिझनेस

जर आपण ग्रामीण भागात राहत असाल तर वेल्डिंग फॅब्रिकेशन चा बिजनेस आपल्यासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. गावात मोठ्या प्रमाणात लोखंडाचे दरवाजे खिडक्याची मागणी असते म्हणून आपण देखील हा व्यवसाय सुरु करून संधीचे सोने करू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची मागणी मोठ्या प्रमाणात असते शिवाय हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे हा व्यवसाय सुरू करून आपण चांगली मोठी कमाई करू शकता. शिवाय या व्यवसायासाठी जास्त भांडवलाची देखील आवश्यकता भासत नाही.

खते व बियाण्यांचे दुकान

ग्रामीण भागात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे, शेतीमध्ये अनेक पिकांचे बियाणे तसेच पिकासाठी अनेक प्रकारचे खतांची आवश्यकता भासते. त्यामुळे तुम्ही  खते व बियाण्यांची दुकान सुरू करून चांगली मोठी कमाई करू शकता मात्र यासाठी आपणास व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स ची आवश्यकता लागेल. जर आपले शिक्षण ॲग्री क्षेत्रातले असेल तर आपण हा व्यवसाय सुरु करून चांगली मोठी कमाई करू शकता.

टेलरिंगचे काम

मित्रांनो जर आपणास शिवणकामचा छंद असेल तर हा व्यवसाय आपल्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो. ग्रामीण भागात अनेक लोक रेडीमेड ऐवजी शिवून कपडे घालने पसंत करत असतात त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे बघायला मिळते. जर आपल्याकडे टेलरिंगचे कौशल्य असेल तर आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय देखील खूपच कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू केला जाऊ शकतो.

English Summary: start these business in village and earn in lakh rupees Published on: 05 January 2022, 09:10 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters