मित्रांनो आज आम्ही आपणास एका विशिष्ट व्यवसायाची माहिती देणार आहोत, आपण हा व्यवसाय सुरू करून पहिल्या दिवसापासूनच कमाई करू शकता. अमूल डेअरी प्रॉडक्ट बनवणारी एक कंपनी आहे मित्रांनो आपण या कंपनीसोबत आपला स्वतःचा व्यवसाय करू शकता आणि चांगली मोठी कमाई करू शकता. मित्रांनो, सध्या अमूल फ्रॅंचाईजी देत आहे, आपणही फ्रॅंचायजी घेऊन अमूलचे आउटलेट सुरू करून एक आपला स्वतःचा हक्काचा व्यवसाय सुरू करू शकता. अमूलची फ्रॅंचाईजी घेणे आपल्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते कारण की, अमूल एक इंटरनॅशनल ब्रँड आहे त्यामुळे याची मागणी बाजारात सदैव बघायला मिळते.
2 लाखांत उभारा आपला स्वतःचा व्यवसाय- अमूल कोणतीही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेरिंग शिवाय फ्रेंचायझी देत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्च काही जास्त नाही. आपणास जर अमूलची फ्रॅंचायजी घ्यायची असेल तर आपण 2 ते 6 लाख रुपये खर्च करून अमुलची फ्रॅंचायजी घेऊ शकता आणि आपला व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायाच्या सुरुवातीलाच आपणांस यापासून चांगला नफा मिळू शकतो. फ्रँचायझीच्या माध्यमातून दरमहा आपण 5 ते 10 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. असे असले तरी, यामध्ये कमी जास्त होऊ शकते, ते सर्वस्वी आपल्या आउटलेटच्या एरियावर अवलंबून असेल.
फ्रँचायझी कशी घेणार जाणुन घ्या - मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत असते. यामध्ये पहिली आहे अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिल्या टाईपच्या फ्रॅंचाईजीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपणांस जवळपास 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर दुसऱ्या टाईपच्या फ्रेंचायझी घेण्यासाठी आपणांस 5 लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून भरावे लागणार आहेत.
कसा आणि किती मिळतो यापासून नफा - मित्रांनो आपण जर अमूलची फ्रॅंचाईजी घेतली तर आपणांस अमूल आपल्या प्रॉडक्टवर कमिशन देत असते. आपण जेवढे अधिक प्रॉडक्ट सेल कराल तेवढा आपला कमिशन वाढेल. अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल उत्पादनांच्या किमान विक्री किंमतीवर (MRP) कमिशन देते. अमूलच्या अधिकृत साईटनुसार, एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन कंपनीकडून दिले जाते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतल्यावर रेसिपीवर आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते याशिवाय कंपनीने प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन कंपनीकडून देण्यात येते.
व्यवसायासाठी आवश्यक जागा- मित्रांनो आपण अमूल आउटलेट ही फ्रॅंचाईजी घेतल्यास आपणास जवळपास 150 चौरस फूट जागा लागणार आहे. आणि जर आपण अमूल आईस्क्रीम पार्लरची फ्रँचायझी घेतली तर यासाठी आपल्याला किमान 300 चौरस फूट जागा लागणार आहे. आपण जागा भाडेतत्त्वावर देखील घेऊ शकता, परंतु जागेची आवश्यकता असतेच
फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करायचा-जर तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला retail@amul.coop वर मेल करावा लागेल. याशिवाय http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकवर जाऊनही माहिती घेता येईल.
Share your comments