1. इतर बातम्या

शेतकरी मित्रांनो व्यवसाय करायचाय का? मग करा ह्या व्यवसायापैकी एक आणि कमवा बक्कळ पैसा

शेतकरी बांधवांनो जर आपली शेती समवेतच व्यवसाय करण्याची इच्छा असेल, किंवा अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी काही साधन बघत असाल तर आज आम्ही आपल्यासाठी काही व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलो आहोत. या व्यवसायांपैकी एक व्यवसाय सुरू करून आपण चांगली मोठी कमाई करू शकता. आज आम्ही आपणास कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येणारे व्यवसाय विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
profitable agri business

profitable agri business

शेतकरी बांधवांनो जर आपली शेती समवेतच व्यवसाय करण्याची इच्छा असेल, किंवा अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी काही साधन बघत असाल तर आज आम्ही आपल्यासाठी काही व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलो आहोत. या व्यवसायांपैकी एक व्यवसाय सुरू करून आपण चांगली मोठी कमाई करू शकता. आज आम्ही आपणास कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येणारे व्यवसाय विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

शेती समवेतच सुरू करता येणारे व्यवसाय

फर्टीलायझर आणि बियाण्यांचे दुकान

शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागात 80% जनसंख्या हे केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून असते.शेती म्हटले की फर्टीलायझर आणि बियाणे आवश्यक असतात. त्यामुळे या बिझनेसची मागणी ही ग्रामीण भागात लक्षणीय बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडेॲग्री क्षेत्रातील पदवी असेल तर आपणास हा बिजनेस सहज रित्या सुरू करता येऊ शकतो. हा बिझनेस सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर परवाना घेणे आवश्यक असते. त्यामुळे हा बिझनेस फक्त ऍग्रीच्या विद्यार्थ्यांनाच करता येऊ शकतो.

शहरात भाजीपाला फळे इत्यादी शेतमालाची विक्री करणे

शेतकरी मित्रांनो आपण सोन्यासारखा शेतमाल आपल्या शेतात पीकवत असतो, मात्र  याचा नफा व्यापारी वर्गाला जास्त मिळताना दिसतो. आपला सोन्यासारखा माल आपण व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात अनेकदा विक्री करत असतोआणि व्यापारी लोक यातून प्रचंड नफा कमवीत असतात. त्यामुळे जर आपण आपल्या शेतात पिकत असलेला भाजीपाला, फळे इत्यादी शेतमाल आपण डायरेक्ट शहरात जाऊन थेट सामान्य ग्राहकाला विकू तर याचा फायदा आपणास नक्कीच होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो यासाठी आपणास जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज भासत नाही कारण की आपण आपल्या शेतीत पिकवत असलेला माल फक्त व्यापाऱ्याला न देता तो थेट ग्राहकाला विकायचा आहे यासाठी आपणास वाहतुकीसाठी फक्त एक्स्ट्रा खर्च करावा लागणार आहे. यामुळे ग्राहकाला देखील फायदा होईल शिवाय यामुळे आपले देखील उत्पन्न वाढेल.

कोल्ड स्टोरेजची सुरुवात करणे

शेतकरी मित्रांनो अनेक भाजीपाला पिके तसेच फळपिके अनेकदा शेतकरी बांधवांना कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावी लागतात. मात्र ग्रामीण भागातया प्रकारचे कोल्ड स्टोरेज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. जर आपल्याहि गावात कोल्डस्टोरेज उपलब्ध नसेल तर आपण कोल्ड स्टोरेज निर्माण करून आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक फायदेशीर सेवा देऊ शकता शिवाय यातून आपण चांगली मोठी कमाई देखील करू शकता. यामुळे शेतकऱ्यांचा हि फायदा होईल तसेच आपले देखील उत्पन्न वाढेल.

English Summary: start these agri related business and earn more profit learn more about it Published on: 10 January 2022, 10:05 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters