देशात अनेक युवक व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत असतात, मात्र भांडवलाअभावी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आज आपण अशा एका व्यवसाय विषयी जाणून घेणार आहोत या व्यवसायाची सुरुवात कमी भांडवलात करता येते. आज आपण लो इन्वेस्टमेंट मध्ये चांगली कमाई करता येऊ शकणाऱ्या एका व्यवसाय विषयी जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या व्यवसायाविषयी बोलत आहोत त्या व्यवसायाचे नाव आहे मुरमुरा मेकिंग बिजनेस. भारतात या व्यवसायाची प्रचंड डिमांड असते. देशात सर्वत्र मुरमुरा ला मोठी मागणी असते. देशात अनेक ठिकाणी मुरमुरा पासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात मुरमुरे पासून भेल पुरी बनवली जाते, जी की सर्वत्र खुपच लोकप्रिय आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया मुरमुरा बनवण्याच्या या व्यवसायाविषयी.
व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट
मित्रांनो जर आपणास मुरमुरा मेकिंग बिझनेस सुरु करायचा असेल तर यासाठी आपल्याला जागेची आवश्यकता भासणार आहे. आपल्याकडे जर स्वतःची जागा नसेल तर आपण भाडेतत्त्वावर देखील जागा घेऊ शकता. जागा घेतल्यानंतर या व्यवसायासाठी शेडचे निर्माण करावे लागणार आहे. जर आपण हजार स्क्वेअर फूट जागेवर शेडचे निर्माण करण्याचे ठरवले तर आपणास सुमारे दोन लाख रुपये पर्यंत खर्च अपेक्षित आहे. शेड समवेतच या व्यवसायासाठी अनेक मशिनरी देखील विकत घ्याव्या लागतात यासाठी सुमारे एक लाख रुपये पर्यंत खर्च अपेक्षित असतो.
या समवेतच या व्यवसायासाठी साठ हजार रुपयापर्यंत वर्किंग कॅपिटल देखील आवश्यक असते. या व्यवसायासाठी सर्व खर्च चार लाख रुपयांपर्यंत येतो. मित्रांनो जर आपल्याकडे एवढी अमाऊंट उपलब्ध नसेल तर आपण या व्यवसायासाठी कर्ज देखील प्राप्त करू शकता या व्यवसायासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे सुमारे चार लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होते. यासाठी आपणास एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत दिल्यानंतर बँक आपणास सहज रित्या कर्ज देऊ शकते.
किती होणार कमाई
चार लाख रुपये खर्च करून जर कुणी हा व्यवसाय सुरू केला तर दरवर्षी 370 क्विंटल मुरमुरा उत्पादित केला जाऊ शकतो. म्हणजे साडेचार लाख रुपये किंमतिचे उत्पादन तयार होणार, आणि याची प्रोजेक्टेड सेल कॉस्ट साडेपाच लाख रुपये असेल.
Share your comments