आपल्याला अनेकजण व्यवसाय करण्याचा सल्ला देत असतात. नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय बरा असं आपण म्हणत असतो. पंरतु पैसा किंवा पुरेसे भांडवल नसल्याने आपण सुरू करू शकत नसतो. स्वत:चा व्यवसाय असावा असे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी मोदी सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे, पंतप्रधान जन औषधी योजना(PMJAY). पंतप्रधान मोदी सरकारच्या यो योजनेतून तुम्ही मेडिकलचे दुकान सुरू करू शकता. विशेष म्हणजे आपला व्यावसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून मदतही मिळत आहे.
हो, सरकार हे मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी २.५ लाख रुपयांचे अनुदान देत आहे. याशिवाय तुम्ही औषधाच्या छापील किंमतींवर २० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवू शकता. सरकारची ही योजना ७०० जिल्ह्यांमध्ये सुरू झाली असून ६ हजार २०० जन औषध केंद्र सुरू झाले आहेत. गरीब लोकांना आणि सामान्य लोकांना अगदी वाजवी दरात औषध उपलब्ध व्हावीत, असा उद्देश या योजनेचा आहे.
कोण सुरू करु शकते हे औषध केंद्र
जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी कोणीही पात्र आहे. मग तुम्ही डॉक्टर, वकील, व्यापारी, शेतकरी, किंवा फार्मासिस्ट असो. कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. विशेष म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि दिव्यांगांना औषध केंद्र सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये दिले जातात.
असा मिळतो औषध केंद्राचा फायदा
या योजनेतून केंद्र सरकार जनेरिक औषधांवर सुट देते. याशिवाय छापलेल्या किंमतीवर पण २० टक्के नफा दिला जातो. इतकेच नाही तर औषध केंद्र सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदतही केली जाते. जर तुम्ही एका वर्षापर्यंत औषधांची विक्री करता तर सरकार आपल्याला १० टक्के इन्सेंटिव्ह पण देते. पण यातून मिळणारे पैसे हे १० हजार रुपयांपेक्षा अधिक नसतील. उत्तर-पुर्वी राज्य, नक्सल प्रभावित भागात आदिवासी क्षेत्रात ही रक्कम १५ हजार आहे. PMJAY या योजनेचा अर्ज https://www.pmjay.gov.in/ या लिंकवर जाऊन डाऊनलोड करु शकता.
Share your comments