भारतात बेरोजगारी (Unemployment) हि दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे व्यवसाय (Business) करणे हि काळाची गरज बनत चालली आहे. गावातील अनेक तरुण नौकरीच्या शोधात शहराकडे पलायन करतात, पण नौकरी (job) मिळत नाही अथवा कमी पगारात कसाबसा आपला प्रपंच चालवीत असतात.
वाढते स्थलानंतर हि एक चिंतेची बाब आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी व्यवसाय करायला पाहिजे. अनेक लोक व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहतात पण त्यांना माहितीचा अभाव असतो म्हणुन ते व्यवसाय सुरु करायला घाबरतात. म्हणुन आज आपण गावात राहून कोणते व्यवसाय करता येतील याविषयीं माहिती जाणुन घेणार आहोत. हा आमचा युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयीं सविस्तर.
मित्रांनो गावात वास्तव्य करून देखील व्यवसाय सुरु केला जाऊ शकतो. आता प्रश्न असा उद्भवतो नेमका व्यवसाय करायचा कोणता? ह्याच प्रश्नाचे उत्तर आज आपणांस मिळणार आहे. अनेक लोक व्यवसाय करू पाहता पण इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा नसल्यामुळे लोक व्यवसाय करू शकत नाहीत, पण चिंता करू नका आज आपण गावात राहून कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणते व्यवसाय करता येतील याविषयीं जाणुन घेऊ.
किराणा स्टोर
मित्रांनो शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी किराणा हा लागतोच त्यामुळे हा एक रनिंग व्यवसाय आहे. प्रत्येक माणसाला किराणाची दररोज गरज भासत असते, त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, यातून चांगला पैसा देखील प्राप्त केला जाऊ शकतो. जरी आपल्या गावात ऑलरेडी किराणा स्टोर असेल तरी देखील आपण हा व्यवसाय टाकू शकता. हा व्यवसाय आपण सहजरीत्या सुरु करू शकता. यासाठी आपल्याकडे एक गाळा असायला हवा किंवा आपण जागा हि भाड्याने देखील घेऊ शकता. जागा घेतल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती किराणा माल भरण्याची त्यासाठी तुम्हाला भांडवल लागेल. आपण आधी कमी माल आणून देखील आपला व्यवसाय सुरु करू शकता.
ह्या व्यवसायासाठी आपणांस 50000 रुपये अंदाजित खर्च येऊ शकतो. आपला व्यवसाय चांगला चालायला लागला की आपण आपला व्यवसाय वाढवू शकता आणि चांगली कमाई करू शकता.
भाजीपाला
मित्रांनो भाजीपालाचा व्यवसाय हा अत्यावश्यक सेवामध्ये मोडतो. भाजीपाला हा प्रत्येक घरात लागतो, त्यामुळे हा व्यवसाय आपल्याला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला गाळ्याची आवश्यकता भासेल, आपण एका हातगाडीवर देखील हा व्यवसाय सुरु करू शकता. सुरवातीला हा व्यवसाय आपण फक्त 10000 रुपयात सुरु करू शकता आणि महिन्याकाठी चांगली कमाई करू शकता.
Share your comments