कोरोनाचा फटका जरी अर्थव्यवस्थेला बसला असला तरी महागाई मात्र जशीच्या तशीच आहे. त्यात घरी एकच व्यक्ती कमवता असला तर महिन्याच्या बजेटमध्ये मोठा गोंधळ उडत असतो. यामुळे पुरुष मंडळी वर्किंग पार्टनरच्या शोधात असतात. अशा जर पत्नी जर घरकाम करणारी असेल आणि स्वालंबी होण्याची विचार करत असेल तर सरकार आपल्यासाठी एक विशेष गुंतवणूक योजना आणत आहे. ज्यामुळे दरमहा तुम्हाला पैसे मिळतील. दरम्यान ही योजना आहे ती म्हणजे National Pension Scheme (NPS) नॅशनल पेन्शन योजना. यात गुंतवणूक करुन आपल्या पत्नीला आत्मनिर्भर करू शकतात. या योजनेतून तुम्ही नियमित पैसाही मिळू शकतात. ही योजना शेतकऱ्यांसाठीही फायद्याची आहे.
कसे उघडणार खाते -
आपल्या पत्नीला आत्मनिर्भर बनविण्यासाठी तुम्हाला एनपीएस खाते सुरु करावे लागेल. एनपीसी खाते आपल्या पत्नीला वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक पुर्ण रक्कम देत असते. याशिवाय त्यांना दर महिन्याला पेन्शन म्हणून दिले जाणार आहेत. विशेष दर महिन्याला किती पैसे मिळाले पाहिजे याची मर्यादाही आपण ठरवू शकणार आहात. यामुळे तुमच्या पत्नीला वयाच्या ६० व्या वर्षानंतर पैशासाठी कोणावर विसंबून राहण्याची गरज नाही.
६० वर्षात मॅच्युअर होईल आपले एनपीएस खाते -
जर तुम्ही एनपीसी खात्याच्या सुविधेनुसार तुम्ही वर्षाला किंवा दर महिन्याला पैसे एनपीएस खात्यात टाकू शकतात. तुम्ही आपल्या पत्नीच्या नावाने साधरण १ हजार रुपयांने एनपीएस खाते उघडू शकतात. दरम्यान ही खाते वयाच्या ६० व्या वर्षी मॅच्युअर होत असते, पण तुम्ही हे खाते ६५ व्या वर्षापर्यंत वाढवू शकतात.
हेही वाचा : अटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता
प्रत्येक महिन्याला मिळतील ४५ हजार रुपये
प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये मिळणार आहेत, पण इतके पैसे कसे मिळतील असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल. हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. जर आपल्या पत्नीचे वय ३० असेल तर त्यांच्या एनपीएस खात्यात जर ५ हजार रुपये टाकत असाल तर तुम्हाला वर्षाला १० टक्क्याप्रमाणे रिटर्न मिळते. जर पत्नीचे वय ६० वर्ष होईल तर त्यांच्या खात्यात साधरण १.१२ कोटी रुपये जमा होतील. यातील साधरण ४५ लाख रुपये तुमच्या पत्नीला मिळतील. याशिवाय दर महिन्याला ४५ हजार रुपयांच्या आसपास पेन्शन मिळेल आणि ही पेन्शन आजीवन मिळणार आहे. यामुळे आपले भविष्य सुकर होणार होईल.
NPS एनपीएस योजनेतील महत्वाच्या गोष्टी
वय - ३० वर्ष
गुंतवणूक करण्याची कालावधी - ३० वर्ष
दर महा भरणा - ५ हजार रुपये
गुंतवणुकीवर मिळणारी रक्कम - १० टक्के
एकूण जमा होणारा पेन्शन फंड - १ कोटी ११ लाख ९८ हजार ४७१ रुपये. हे पैसे तुम्ही मॅच्युरिटी झाल्यानंतर काढू शकतात.
४४ लाख ७९ हजार ३८८ रुपये एन्युटी प्लान खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम.
६७ लाख १९ हजार ०८३ निश्चित एन्युटी रेट ८ टक्के.
महिन्याला मिळणारी रक्कम ४४ हजार ७९३ रुपये.
Share your comments