नमस्कार मित्रांनो आज आपण एक बिझनेस आयडिया घेऊन हजर झालो आहोत हा बिजनेस आपण कमी पैशात सुरू करू शकता आणि यातून चांगली मोठी कमाई देखील होऊ शकते. हा व्यवसाय आपण जिथे राहता तिथून देखील करता येऊ शकतो. आमच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो आहे बॉल पेन मेकिंग बिझनेस. प्रत्येक व्यक्ती रोज पेनचा वापर करत असतो. विद्यार्थ्यांसाठी, ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी, अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकासाठी पेन अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्यांची मागणी अधिक आहे, म्हणून या व्यवसायातून बक्कळ कमाई करण्याचे चान्सेस आहेत. आज आपण बॉल पेन मेकिंग बिजनेस विषयी सर्व बारीक सारीक गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या व्यवसायाविषयी.
कसा सुरू करणार हा व्यवसाय
बॉल पेन मेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला जागेची आवश्यकता भासेल, जर आपल्याकडे जागेची व्यवस्था नसेल तर आपण भाडेतत्त्वावर जागा घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता किंवा आपणास जर जास्त पैसा इन्वेस्ट करायचा नसेल तर आपण हा बिझनेस आपण ज्या घरात राहतात तेथून देखील सुरू करू शकता. अलीकडे अनेक छोट्या तसेच मोठ्या कंपन्या देखील पेन चा बिजनेस करीत आहेत. बॉल पेन मेकिंग बिझनेस मध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्वालिटीची जर आपण चांगली कॉलिटीचा पेन ग्राहकांना उपलब्ध करून दिला तर या बिजनेस मधून एक चांगला नफा कमवू शकता, तसेच यामुळे आपला ब्रँड तयार होईल आणि त्याचा फायदा आपणास व्यवसाय वाढविण्यासाठी होऊ शकतो. बॉल पेन मेकिंग बिझनेस मध्ये क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी शाईची अर्थात इंकची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. जर आपण चांगल्या क्वालिटीची इंक बॉलपेन मध्ये युज केली तर त्यामुळे त्यांची क्वालिटी चांगले बनेल आणि आपला पेन चा सेल वाढेल आणि साहजिकच यामुळे आपले उत्पन्न देखील वाढेल.
बॉल पेन मेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारे कच्चे मटेरियल
बॅरल- बॉल पेन बनवण्यास सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे बॅरल, बॅरल मध्ये बोल पेनाची शाही भरली जाते. हे बॅरल आपणास 50 पैसे ते 60 पैसे दरम्यान भेटते. म्हणजे पन्नास ते साठ रुपये शेकडा.
अडॅप्टर -अडॅप्टर हा बॅरल आणि टीपला जोडणारा महत्वाचा भाग असतो. हे अडॅप्टर तीन ते चार रुपये शेकडा प्रमाणे भेटते.
टीप- टिप हा बॉलपेनचा पुढचा भाग भाग आहे जिथून लिहिताना नियमितपणे शाई बाहेर पडते म्हणजे ज्याद्वारे लिहिले जाते त्याला टीप म्हणतात. तुम्हाला टीप चोवीस रुपये शेकडा प्रमाणे मिळेल.
झाकण - हे पेनची टीप झाकण्यासाठी वापरले जाते. बॉलपेनची झाकणे ही 25 रुपये शेकड्या प्रमाणे मिळतात.
शाई - पेनसाठी हे सर्वात महत्वाचे साहित्य आहे जे 120 ते 400 रुपये प्रति लिटर प्रमाणे बाजारात उपलब्ध होते.
बॉल पेन मेकिंग बिझनेस साठी लागणारी मशीन
हा बिजनेस स्मॉल स्केलवर जर आपणांस सुरु करायचा असेल तर, आपणास बॉल पेन मेकिंग मशीन पंचवीस हजार रुपये पर्यंत सहज भेटू शकते. जर आपणास ऑटोमॅटिक मशीन हवे असेल आणि व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु करायचा असेल तर यासाठी आपणास चार लाख रुपये मोजावे लागतील शिवाय इतर खर्चही लागेल. बॉल पेन मेकिंग बिझनेस हा एक प्रोफिटेबल बिजनेस आहे आपण हा बिझनेस सुरू करून चांगली मोठी कमाई करू शकता.
Share your comments