एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते. ज्यामधून ग्राहकांना चांगला फायदा होतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती पाहणार आहोत, ज्या योजनेचा महिलांना चांगला लाभ मिळणार आहे. ही योजना खास महिलांसाठी आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेयचा असेल तर तुम्हाला काहीशी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला 4 लाख रुपयांचा लाभ दिला जाईल. या योजनेतील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
एलआयसीसह पोस्ट ऑफिस (LIC, post office) अंतर्गतही महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. ज्याचा अनेक महिलांना लाभही मिळतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने सुरू केलेली योजना देखील अशीच एक योजना आहे. या योजनेतून महिलांना 4 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. जर एखाद्या महिलेला काही पैसे गुंतवायचे असतील तर ही योजना एक चांगला पर्याय आहे.
Tur Market Price: 'या' बाजार समितीत तुरीला मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या दर
LIC आधार शिला योजना काय आहे?
महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना (scheme) सुरू करण्यात आली आहे. ही योजना देखील एक प्रकारची सुरक्षा आणि बचतीचा विचार करून बनविलेली योजना आहे. मात्र या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे. यासाठी महिलांचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक खाते असणेही आवश्यक आहे.
महिला यामध्ये फक्त 29 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. तसेच, या पॉलिसीच्या (policy) मॅच्युरिटीवर 4 लाखांचा फायदा देखील आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रामुख्याने महिलांना या योजनेद्वारे कमी पैसे गुंतवण्याची संधी देत आहे. जर एखाद्या महिलेने त्यात थोडीशी गुंतवणूक केली तर तिला काही वर्षांनी चांगला नफा देखील मिळू शकतो.
शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन
गुंतवणूक अशी करा
या पॉलिसीचा कालावधी किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे. या योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कोणत्याही महिलेचे वय केवळ 8 ते 55 वर्षे असावे. जर तुमच्या घरात एक लहान मूल असेल ज्याचे वय 8 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही तिच्या नावावर गुंतवणूक करू शकता.
या योजनेची कमाल परिपक्वता वय 70 वर्षे आहे. या प्लॅनमधील प्रीमियम पेमेंट (Premium payment) मासिक किंवा दरवर्षी आधारावर केला जातो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी दररोज सुमारे 29 रुपये जमा केले तर तुमच्याकडे सुमारे 11 हजार रुपये जमा होतील.
यानंतर तुम्ही दर महिन्याला 900 रुपये गुंतवले तर 20 वर्षांत सुमारे 2 लाख रुपये गुंतवले जातील. यानंतर, पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो कोरडवाहू क्षेत्रात लागवड 'अशा' पद्धतीने करा; पिके येतील जोमात
दिलासादायक! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा; 728 कोटी रुपयांहून कर्ज वाटप
आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ
Share your comments