आधार कार्ड हे सगळ्या महत्वाचे कागदपत्र पैकी एक कागदपत्र आहे. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल,बँकेत खाते उघडायचे असेल या व अशा अनेक कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड व इतर कागदपत्र यांच्यामध्ये असलेली माहिती जर वेगवेगळी असेल तरी ही समस्या उद्भवू शकते
यावेळी आपल्याला जर आधार वर असलेली माहिती चुकीचे असेल तर आपण ती अपडेट करू शकतो. परंतु आधार कार्ड वरील माहिती अपडेट करण्याचे काही नियम आहेत, ते माहित असणे फार गरजेचे आहे. त्या लेखात आपण त्याविषयी जाणून घेऊ.
आधार वरील जन्मतारीख अपडेट करणे बद्दल……..
आधार कार्ड वरून की जन्मतारीख चुकली असेल तर ती कधीच बदलता येत नाही. आधार कार्ड धारकाला आपल्या जन्मतारखेत बदल करता येत नाही.पण जर आधार कार्ड बनवताना जन्मतारीख चुकले असेल तर इतर कागदपत्रांचा पुरावा देऊन ती चूक दुरुस्त करता येते. आधार कार्ड वरील जन्मतारीख फक्त एकदाच अपडेट करता येऊ शकते.
आधार वरील नाव अपडेट करण्याबद्दल………..
जर आधार कार्ड तुमचे नाव तुम्हाला बदलायचा असेल तर ते तुम्ही फक्त दोन वेळा बदलू शकतात. याबाबतीत यूआयडीएआय ने अधिसूचना जारी केली होती. नावांमध्ये फक्त दोनदा बदल करता येतो त्यानंतर आधार मधील नावात तुम्हाला बदल करता येत नाही.
आधार वरील पत्ता बदलण्यासाठी……..
आधार कार्ड वाडी तुमचा पत्ता जो असेल त्याच्या मध्ये देखील बदल करता येतो. परंतु त्यासंबंधी असा नियम आहे की तुम्हाला जर आधार कार्ड वरील पत्ता बदलायचा असेल तर तो फक्त एकदाच बदलता येतो.
तसेच तुमची जेंडर अपडेट करायचे असेल तर ते सुद्धा फक्त एकदाच अपडेट करता येते.
आधार अपडेट साठी लागणारी कागदपत्रे
- नावात बदल करायचा असेल तरमतदान ओळखपत्र, पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स देणे गरजेचे असते.
- तुमचा अड्रेस अपडेट करायचा असेल तर बँकेचे स्टेटमेंट, पाण्याचे बिल किंवा रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे गरजेचे आहे.
- तुमची जन्मतारीख बदल करायचे असेल तर आधार कार्ड धारकाचा जन्म दाखला,पासपोर्ट किंवा विद्यापीठाचे गुणपत्र देणे आवश्यक आहे.
(संदर्भ-Timesnownews मराठी)
Share your comments