कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात एपीएफओ कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन पेन्शन व त्यांचा प्रॉव्हिडंट फंड या व इतर महत्त्वाच्या गोष्टींचे नियमन करते. आपल्याला माहित आहेच की, आपल्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्यांमध्ये जी काही रक्कम जमा होते त्यावर आपल्याला व्याजदेखील मिळते.
परंतु तुम्ही रिटायर होण्यापूर्वी संबंधित नोकरी सोडली किंवा तुमच्या खात्यात सलग 36 महिने कुठल्याही प्रकारचे पैसे जमा झाले नाहीत किंवा केले नाहीत त्यामुळे पीएफ खाते एनपीए अर्थात निष्क्रिय श्रेणीत जाते.
नक्की वाचा:कामाची बातमी! PF खात्यावर मिळणार पेन्शन; जाणून घ्या नियम आणि अटी
आता प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात अशा लोकांच्या पगारामधून काही हिस्सा कट केला जातो व तो कट केलेला पगाराचा हिस्सा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा केला जातो व ते पैसे कर्मचारी रिटायर झाल्यानंतर एकरकमी मिळतात.
समजा तुम्हाला मध्येच काहीतरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली व तुम्हाला आता पैशांची नितांत गरज आहे अशा परिस्थितीत तुम्हाला काही पैसे या खात्यातून काढता येतात. या तुमच्या जमा होत असलेल्या पैशांवर व्याज देखील मिळते परंतु काही गोष्टींमुळे तुम्हाला मिळणारे हे व्याज थांबू शकते. तर आपण या लेखात हे व्याज कोणत्या कारणांमुळे थांबू शकते याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Pan Card Rule: पॅन कार्ड संबंधित 'ही'चूक पडू शकते 10 हजारात, वाचा काय आहे यासंबंधीचा नियम
पीएफ खात्यातील पैशांना मिळणारे व्याज थांबण्याचे कारणे
1- समजा तुम्ही रिटायर होण्याच्या अगोदर नोकरी सोडली व सलग 36 महिने तुमच्या खात्यात कुठल्याही प्रकारचा निधी जमा झाला नाही तर तुमचे खाते एनपीए श्रेणीत जाते व या कारणामुळे देखील तुमच्या जमा झालेल्या पैशांवर व्याज मिळणे बंद होते.
2- समजा एखादा पीएफ खातेदाराचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर संबंधित खाते निष्कर्ष श्रेणित टाकून ते कायमस्वरूपी बंद केले जाते.
3- जर तुम्ही भारतातील नोकरी सोडली व कायमस्वरूपी विदेशात नोकरी साठी स्थायिक झालात तर अशा परिस्थितीत देखील तुमच्या पीएफ खात्यातील पैशांवर मिळणारे व्याज बंद होते.
4- समजा एखादी व्यक्ती वयाच्या 55 व्या वर्षी रिटायर झाली व पुढील तीन वर्ष खात्यातून कुठलीही पैसे काढले नाहीत तरी देखील खाते निष्क्रिय श्रेणित जाते व मिळणारे व्याजाचा फायदा बंद होतो.
नक्की वाचा:Important: 'हे'आहेत रेशन कार्ड संबंधित नवीन नियम, तपासा तुम्ही पात्र आहात की नाहीत?
Share your comments