भारतीय सैन्यदलाच्या आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस पुणे तर्फे सैन्य भरती चा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ही भरती प्रमुख्याने सोल्जर जनरल ड्युटी म्हणजे जी डी, सोल्जर ट्रेडमन आणि सोल्जर टेक्निकल या पदांसाठी होणार आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.
कोणत्या पदांसाठी होईल भरती?
- सोल्जर जनरल ड्युटी
- सोल्जर ट्रेड्समन
- सोल्जर टेक्निकल
- सोल्जर टेक्निकल ( एव्हिएशन व दारुगोळा निरीक्षक )
- सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी
या भरतीसाठी लागणारे आवश्यक पदनिहाय शैक्षणिक पात्रता
- सोल्जर जनरल ड्युटी साठी 45 टक्के गुणांचा दहावी उत्तीर्ण आवश्यक
- सोल्जर ट्रेड्समन पदासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक
- सोल्जर टेक्निकल या पदासाठी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण ( पी सी एम आणि इंग्लिश )
- सोल्जर टेक्निकल ( एव्हिएशन आणि दारू गोळा निरीक्षक ) 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण ( पीसीएम अन इंग्लिश )
- सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी या पदांसाठी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण ( पीसीबी आणि इंग्लिश )
या भरतीसाठी आवश्यक शारीरिक पात्रता
जाहिराती दिल्याप्रमाणे उमेदवारांची शारीरिक ठेवण असणे आवश्यक आहे. उंची, वजन आणि छाती दिलेल्या निकषांप्रमाणे असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी आवश्यक पदनिहाय वयोमर्यादा
- सोल्जर जनरल ड्युटी या पदासाठी उमेदवाराचा जन्म एक ऑक्टोबर 2000 ते 11 एप्रिल 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.
- सोल्जर ट्रेड्समन या पदासाठी उमेदवाराचा जन्म हा एक ऑक्टोबर 1998 ते 11 एप्रिल 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.
- सोल्जर टेक्निकल या पदासाठी उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.
- सोल्जर टेक्निकल ( एव्हिएशन व दारुगोळा निरीक्षक ) या पदासाठी उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.
- सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी या पदासाठी उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.
अ)या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 ही आहे.
ब) या भरतीचे ठिकाण – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर हे आहे.
क ) या भरतीचा कालावधी हा 7 ते 23 सप्टेंबर 2021 असणार आहे.
Share your comments