1. इतर बातम्या

शेतकऱ्यांची वीज देयकातून होतेय सुटका; राज्यात ८६ हजार शेतकऱ्यांकडे सौरपंप कार्यान्वित

पारंपरिक पद्धतीने कृषिपंपांची जोडणी न झालेल्या किंवा दुर्गम भागात असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देत सध्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला गती देण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ८६ हजार शेतात सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
महाराष्ट्र सौर पंप योजना

महाराष्ट्र सौर पंप योजना

पारंपरिक पद्धतीने कृषिपंपांची जोडणी न झालेल्या किंवा दुर्गम भागात असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देत सध्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला गती देण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ८६ हजार शेतात सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा आणि विनाअडथळा सौरपंपाद्वारे पाणी उपलब्ध होत असून, वीज देयकातूनही या शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचा मोठा पैसा वाचणार आहे. सौर कृषिपंपाद्वारे वीजजोड देण्याच्या योजनेमध्ये पंपाच्या आधारभूत किमतीपैकी लाभार्थी शेतकऱ्याला सर्वसाधारण गटात १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती गटात ५ टक्के हिस्सा आहे. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्ष आणि पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्चही शून्य आहे.

हेही वाचा : सोलरपंप, विहीर व बोरवेल वर मिळणार 100% वितरीत निधी; जाणून घ्या पात्र लाभार्थ्यांनी विषयी

योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थींनी मागणी पत्रांचा (डिमांड नोट) भरणा केला आहे, तर ९६ हजार १९१ लाभार्थींनी स्वत: निवडसूचीतील संबंधित पुरवठादारांची निवड केली आहे. या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नवीन वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र कृषिपंप वीजजोडणी धोरणाला वेग दिला आहे.

औरंगाबाद विभागात सर्वाधिक सौरपंप

राज्य शासनाच्या सौर कृषिपंप योजनेमध्ये महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४६ हजार ७०० सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ नागपूर प्रादेशिक विभागात २० हजार १९९, कोकण प्रादेशिक विभागात १३ हजार ९१, तर पुणे प्रादेशिक विभागात ५ हजार ९७३ सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.

 

काय आहेत महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये

  • सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या ९५ टक्के अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ ५ टक्के रक्कम खर्च केली जाईल.

  • महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही.

  • हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही.

  • नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेलची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल.

  • महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे.

  • जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ लाभ 

  • या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  • सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर जलपंपांचे वितरण करणार असून, दुसर्‍या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करणार आहे.आणि तिसर्‍या टप्प्यात राज्य सरकार २५ हजार सौर पंपचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.
  • ५ एकरपेक्षा कमी शेतजमिनी असलेल्या सर्व शेतकर्‍यांना ३ एचपी आणि त्या पेक्ष्या जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी सौर पंप या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
  • ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वी वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौर पंपचा लाभ दिला जाणार नाही.
English Summary: Solar pumps operational to 86,000 farmers in the state Published on: 28 August 2021, 01:10 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters