1. इतर बातम्या

घरावर आणि शेतात सोलर पॅनल एक आर्थिक कमाईचे हमखास साधन

केंद्र शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या घराच्या टेरेसवर सोलर पॅनल बसवून व त्याद्वारे वीजनिर्मिती करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.सौर ऊर्जा हा पर्याय वीजटंचाई वर उपयुक्त ठरू शकतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
solar panel

solar panel

 केंद्र शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या घराच्या टेरेसवर सोलर पॅनल बसवून व त्याद्वारे वीजनिर्मिती करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.सौर ऊर्जा हा पर्याय वीजटंचाई वर उपयुक्त ठरू शकतो.

कुसुम योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतात देखील सोलर पॅनल बसू शकतात.या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. तुम्हाला आवश्यक असलेली वीज वापरून तुम्ही उरलेली वीज विकू शकतात व त्या द्वारे चांगली कमाई करू शकता.

 लाखो बेरोजगार तरुणांसाठी पीएम कुसुम योजनेद्वारे घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून कमाईचा नवा मार्ग शोधनाऱ्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवून सरकार पंतप्रधान कुसुम योजना चालवित आहे. या योजनेद्वारे शेतकरी आपली शेत जमीन खाजगी कंपन्यांना भाड्याने देऊन किंवा सौर पॅनेल बसवून आणि त्यातून मिळणारी वीज विकून नफा मिळू शकतात. या योजनेअंतर्गत एखादी व्यक्ती सौर पॅनल बसवण्यासाठी आपल्या जमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकतात. त्या बदल्यात कंपन्या त्यांना एकरी एक लाख रुपये दराने भाडे देतात तसेच हे भाडे एक ते चार लाखांपर्यंत असू शकते. तसेच एक एकर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना एक हजार युनिट मोफत वीज दिली जाते. आपली आवश्यकतेनुसार वीज वापरून उरलेली विज आपण कंपनीला किंवा सरकारलाही विकू शकतो.

 

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनी आणि अर्जदार यांच्यात सौर पॅनेल्स बसविण्याबाबत आणि भाड्याने देण्यासाठी करार केला जातो. हा कराराची मुदत ही सहसा 25 वर्षापर्यंत असते. हा कराराचा कालावधी पूर्ण झाल्यास  त्यानंतर भाडेवाढ केली जाते. हे संबंधित सौर पॅनल बसवण्याचा सर्व खर्च खाजगी कंपनी करीत असते त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही.

English Summary: solar panel on terrece and farming way of earning Published on: 31 August 2021, 11:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters