महिला आता पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी करू लागले आहेत. असे एकही क्षेत्र नाही की जिथे महिला नाहीत.
अशाच महिलांच्या प्रत्येक क्षेत्रात आगेकूच बद्दल सौदी अरेबियामध्ये एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सौदीमध्ये मक्का ते मदिना या दरम्यान धावणार्या बुलेट ट्रेन च्या महिला चालक पदाच्या 30 जागांसाठी तब्बल 28 हजार महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यावरून दिसून येते की सौदी अरेबियात परिवर्तनाचा एक काळ येऊ घातला आहे. येथील बुलेट ट्रेनचे व्यवस्थापन करणारे रेनफे कंपनी समोर एक मोठी समस्या आली आहे.कंपनीने शैक्षणिक पात्रता व इंग्लिश ज्ञान या गोष्टींना आवश्यक अहर्ता मानले आहे. त्यामुळे हे निकष पूर्ण करुन शकणारी 14000 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. मार्चअखेरपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे असून निवड झालेल्या 30 महिला चालकांना एक वर्षापर्यंत प्रशिक्षण दिल्यानंतर बुलेट ट्रेन चालवण्यासाठी नियुक्ती दिली जाणार आहे..
यादी बुलेट ट्रेन चालवायचे काम फक्त पुरुष चालकांना दिले जात होते परंतु काही दिवसांअगोदर कंपनीने बुलेट ट्रेन चालवण्याची जबाबदारी महिलांवर सोपवण्याचा निर्णय घेतला.जर सौदी अरेबियाचा विचार केला तर येथे 2018 पर्यंत कार चालवण्याचा देखीलपरवानगी नव्हती परंतु गेल्या पाच वर्षात वर्कफोर्समध्ये महिलांची भागीदारी दुपटीने वाढले आहे.सौदीमध्ये आता एकूण वर्क फॉर्स मध्ये 33 टक्के महिला आहेत.सौदीमध्ये अगोदर महिलांना हक्कांच्या बाबतीत रूढीवादी मानले जात होते.
सौदीत 2021 मधील आकडेवारीनुसार महिलांचा बेरोजगारीचा दर तीन पट जास्त आहे. त्यामुळे तेथे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासोबतच आत्तापर्यंत सुमारे पंचवीस लाख महिलांना कार चालवण्याचा परवाना देखील मिळाला आहे. त्याचा फायदा हा ऑटोमोबाईल उद्योगाला चालना मिळण्यात होणार आहे.
Share your comments